बीबीए, एमसीए, एमबीए प्रवेश परीक्षा 12 जुलै रोजी
By Admin | Updated: May 31, 2017 16:55 IST2017-05-31T16:55:43+5:302017-05-31T16:55:43+5:30
विद्यापीठाच्या संकेस्थळावर मंगळवार, 30 मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

बीबीए, एमसीए, एमबीए प्रवेश परीक्षा 12 जुलै रोजी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने बी.बी.ए, बी.एम.एस, बी.एम.एस.(ई-कॉमर्स), बी.सी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्यूटर मॅनेजमेंट), एम.सी.ए. व एम.बी.ए. (इण्टीग्रेटेड) या वर्गाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा 12 जुलै रोजी घेतली जाणार असून यासाठी विद्यापीठाच्या संकेस्थळावर मंगळवार, 30 मे पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
24 जून र्पयत विद्यार्थी आपले अर्ज भरू शकणार आहेत. विद्यापीठाने घोषित केलेल्या संबधित स्वीकृती केंद्रावर (ए.आर.सी.) प्रवेश अर्ज 26 जून र्पयत स्वीकारले जाणार आहेत. प्रवेश अर्जाची प्रिंट व त्यासोबत योग्य ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्ट स्वीकृत करण्यात येईल. प्रवेश पात्र विद्याथ्र्याची यादी 30 जून रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. यादी बाबत विद्याथ्र्याना काही आक्षेप असल्यास 3 जुलै र्पयत लेखी स्वरुपात प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रावर देता येणार आहेत.
4 जुलै रोजी अंतिम यादी होणार प्रसिध्द
पात्र विद्याथ्र्याची अंतिम यादी 4 जुलै रोजी प्रसिध्द केली जाणार असून, 5 जुलै रोजी विद्यापीठाच्या संकेस्थळावर परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर 17 जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रा.बी.व्ही. पवार यांनी दिली.