महाजनांच्या टिकेने रंगणार रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:21 IST2021-02-27T04:21:43+5:302021-02-27T04:21:43+5:30
येत्या काळात जळगाव जिल्हा बँकेची निवडणुक आहे. या बँकेवर खडसे यांच्या कन्या रोहिणी या अध्यक्ष आहेत. तसेच खडसे यांचा ...

महाजनांच्या टिकेने रंगणार रण
येत्या काळात जळगाव जिल्हा बँकेची निवडणुक आहे. या बँकेवर खडसे यांच्या कन्या रोहिणी या अध्यक्ष आहेत. तसेच खडसे यांचा बँकेच्या सभासदांवर प्रभाव देखील आहे. भाजपची धुरा मात्र या बँकेतही गिरीश महाजन यांच्यावरच आहे. महाजन यांनी देवपिंप्रीतून ठराव पाठवला. गेल्या वेळी आपल्या विरोधात असलेल्या माणसांना जवळ करून त्यांनी हा ठराव पाठवला आहे. तर रोहिणी खडसे-खेवलकर यांनी बोदवड तालुक्यातून ठराव पाठवला. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये बोदवड तालुक्यातूनच खडसे कुटुंबाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान मिळाले आहे. त्यामुळे या ठरावामागे देखील नेमके काय शिजतय, हे येत्या काळातच दिसेल.
महाजनांनी खडसेंवर उघड टिका केली. खडसेंनी या आधी भाजपमध्ये असताना देखील अनेकांवर तोंडसुख घेतले होते. मात्र आता तिसऱ्यांदा झालेल्या कोरोनातून बाहेर आल्यानंतर खडसे महाजनांच्या टिकेला नेमके कशा पद्धतीने उत्तर देतील. खडसे हे जाहीर टिका करून महाजनांना उत्तर देतात. की राष्ट्रवादीच्या सहकारातील ताकदीला एकत्र करून भाजपला बँकेत विरोधी बाकांवर बसवून महाजनांना उत्तर देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महाजनांना आता त्यांना बँकेच्या निवडणुकीत सहकारक्षेत्रातील दिग्गज समजले जाणाऱ्या गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे, ॲड.रविंद्र पाटील यांच्यासोबतच शिवसेेनेच्या नेत्यांच्या विरोधात देखील लढायचे आहे.