गावठी दारु अड्डे उद्धवस्त
By Admin | Updated: May 13, 2014 00:23 IST2014-05-13T00:23:25+5:302014-05-13T00:23:25+5:30
रिगाव, ता.मुक्ताईनगर येथील ४० ते ५० तरुणांच्या गटाने पोलिसांच्या मदतीने गावाशेजारील गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त केले.

गावठी दारु अड्डे उद्धवस्त
कुºहा (काकोडा) : येथून जवळच असलेल्या रिगाव, ता.मुक्ताईनगर येथील ४० ते ५० तरुणांच्या गटाने पोलिसांच्या मदतीने गावाशेजारील गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त केले. आरोपींवर कारवाई करण्यात आली. रिगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याठिकाणी काही लोक दारु पिऊन गोंधळ करतात त्यामुळे सत्पाहात भाविक पुरुष-महिलांसह अबालवृद्धांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही गावठी दारु बनविणारे दारुचे अड्डे सात दिवसही बंद ठेवत नसल्याचे लक्षात येताच गावातील सोपान पांडुरंग तलवारे, किशोर दामोदर विटे, नामदेव कोळी, प्रभाकर मुंडे, विष्णू विटे, मुकुंदा बिलेवार या तरुणांनी इतरांच्या मदतीने व कुºहा दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर बरकले, विनोद पाटील, प्रशांत विरनारे, अभिजीत सैंदाणे, संतोष चौधरी यांना सोबत घेऊन रिगाव शिवारातील चार अवैद्य गावठी दारु अड्डे उद्धवस्त केले. यात १५ लीटरचे ५५ डबे होते. आरोपी गणेश रमेश बेलदार (रा.रिगाव) विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ६५ ई प्रमाणे फ, ब, क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुपारी तीन वाजता झालेल्या घटनेत एकही आरोपी घटनास्थळी आढळून आला नाही. (वार्ताहर)