युवासेनेतर्फे आजपासून बास्केटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:18+5:302021-09-24T04:20:18+5:30

जळगाव : शिवसेना आणि युवा सेनेतर्फे शुक्रवारी रायसोनी महाविद्यालय येथे उत्तर महाराष्ट्रस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा ...

Basketball tournament from today by Yuvasena | युवासेनेतर्फे आजपासून बास्केटबॉल स्पर्धा

युवासेनेतर्फे आजपासून बास्केटबॉल स्पर्धा

जळगाव : शिवसेना आणि युवा सेनेतर्फे शुक्रवारी रायसोनी महाविद्यालय येथे उत्तर महाराष्ट्रस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. गुरुवारी मुंबईत सेनाभवनात या स्पर्धेच्या पोस्टर आणि टी-शर्टचे विमोचन करण्यात आले. यावेळी विराज कावडिया, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, दिनेश पाटील उपस्थित होते.

यात खान्देशातील मुले आणि मुलींचे दहा संघ सहभागी होती. स्पर्धेसाठी जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शीतल शेठ, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, उपमहापौर कुलभूषण पाटील, शोभा चौधरी, युवासेना विस्तारक अजिंक्य चुंभळे, धनश्री कोळगे, प्रीतम रायसोनी, डॉ. प्रीती अग्रवाल उपस्थित राहणार आहे.

यशस्वीतेसाठी शिवराज पाटील, विराज कावडिया, अमित जगताप, स्वप्निल परदेशी, प्रीतम शिंदे, पीयूष हसवाल, भूषण सोनवणे, संस्कृती नेवे, नेहल मोडक, सयाजी जाधव, दिनेश पाटील परिश्रम घेत आहेत.

Web Title: Basketball tournament from today by Yuvasena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.