४२ कोटी ५० खर्चून ग्रामीण भागात मिळणार मुलभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 11:03 PM2021-04-23T23:03:39+5:302021-04-23T23:04:42+5:30

विविध विकास कामांना मंजुरी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावाज जळगाव : ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविणे  योजनेअंतर्गत जळगाव ...

Basic facilities will be provided in rural areas at a cost of Rs. 42.50 crore | ४२ कोटी ५० खर्चून ग्रामीण भागात मिळणार मुलभूत सुविधा

४२ कोटी ५० खर्चून ग्रामीण भागात मिळणार मुलभूत सुविधा

googlenewsNext

विविध विकास कामांना मंजुरी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावाजजळगाव

: ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविणे  योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध कामांसाठी तब्बल ४२ कोटी ५० लाख रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी जिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

 राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने  लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  
या अनुषंगाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जिल्ह्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४१७ कामांकरिता ३३ कोटी ५० लाख तर जिल्हा परिषदकडे २५९ कामासाठी ९ कोटी असा एकूण ६७६ कामांसाठी  ४२ कोटी ५० लाखांच्या निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. 

मंजूर कामे

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावंतर्गत सभामंडप, मल्टीपर्पज हॉल, रस्त्यांवर व चौका चौकात पेव्हींग ब्लॉक बसविणे, रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम, रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, चौक सुशोभिकरण, स्मशानभूमी बांधकाम व अप्रोच रस्ते, शेड बांधकाम, हायमास्ट लॅम्प बसविणे; गावंतर्गत छोटे पूल व मोर्‍या बांधकाम, सभागृह बांधकाम अशी विविध कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: Basic facilities will be provided in rural areas at a cost of Rs. 42.50 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव