बसवा मोरपंखी मखरात गणपती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:25+5:302021-09-04T04:21:25+5:30
जळगाव : गणपती बाप्पाचे आगमन आता आठवडाभरावर आले आहे. त्यामुळे सर्वजण घराघरात आरास करण्याची तयारी करीत आहेत. अनेक जण ...

बसवा मोरपंखी मखरात गणपती !
जळगाव : गणपती बाप्पाचे आगमन आता आठवडाभरावर आले आहे. त्यामुळे सर्वजण घराघरात आरास करण्याची तयारी करीत आहेत. अनेक जण बाजारातून तयार आरास साहित्य आणतात. सध्या बाजारात नवनवे मखर दाखल झाले आहेत. मोर गणेशाचा भाऊ कार्तिकाचे वाहन असले तरी मोरपंखी मखरांची बाजारात चलती आहे.
पुढच्या शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र बाजारात गणेशोत्सवाची रेलचेल आहे. जळगावच्या बाजारपेठेत ‘मेड इन इंडिया’ मखर उपलब्ध आहे. बहुतेक व्यावसायिकांनी यंदाही चिनी साहित्य ठेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बाजारातील या मखरांच्या किमतीदेखील काहीशा वाढल्या आहेत. सध्या १ हजार रुपयांपासून मोरपंखी मखर उपलब्ध असल्याची माहिती व्यावसायिक हितेश मंडोरा यांनी दिली.
त्यासोबतच फुल बंगला, कृत्रिम झेंडूच्या फुलांची आरास असलेले मखर, सिंहासन बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचा आकार १० ते १२ इंचांपासून आहे. त्यासोबत इतर आरास साहित्यदेखील उपलब्ध आहे. झुंबर, विविध रंगीबेरंगी माळादेखील बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.