नशिराबाद येथे बारागाडय़ा जल्लोषात
By Admin | Updated: April 13, 2017 11:32 IST2017-04-13T11:32:02+5:302017-04-13T11:32:02+5:30
खंडेराव महाराज की जयचा जयजयकार करीत हळदीचा भंडारा उधळीत नशिराबाद येथे बुधवारी संध्याकाळी बारागाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम झाला.

नशिराबाद येथे बारागाडय़ा जल्लोषात
नशिराबाद, ता.जळगाव, दि.13- येळकोट- येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जयचा जयजयकार करीत हळदीचा भंडारा उधळीत नशिराबाद येथे बुधवारी संध्याकाळी बारागाडय़ा ओढण्याचा कार्यक्रम झाला.
सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक झाला. राजू महाराज व्यवहारे यांनी मंत्रोच्चार केला. भगत सुदाम धोबींसह सहका:यांनी पूजन केले. बारागाडय़ानंतर कठडे मिवणूक काढण्यात आली व रात्री लोकनाटय़ाचा कार्यक्रम झाला. उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष जि.प.सदस्य लालचंद पाटील, ज्ञानदेव लोखंडे, मोहन येवले, किशोर पाटील, भरत बोंडे, किरण पाटील, राजेंद्र चौधरी, मिलिंद देशपांडे, सुदाम कोळी, मंगल चौधरी, गणेश व दुर्गा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.