अभियंता दिनानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत स्नेहभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:32+5:302021-09-21T04:19:32+5:30

जळगाव : अभियंत्यांचे आराध्य दैवत असलेल्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी महावितरणच्या जळगाव कार्यालयातील अभियंत्यांनी शहरातील मातोश्री वृद्धाश्रमातील ...

A banquet with the seniors of the old age home on the occasion of Engineer's Day | अभियंता दिनानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत स्नेहभोजन

अभियंता दिनानिमित्त वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत स्नेहभोजन

जळगाव : अभियंत्यांचे आराध्य दैवत असलेल्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी महावितरणच्या जळगाव कार्यालयातील अभियंत्यांनी शहरातील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत स्नेहभोजन घेऊन अभियंता दिन साजरा केला, तसेच तेथील ज्येष्ठ नागरिकांसाठी सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे आश्रमाला १०० खुर्च्या भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाला मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारुक शेख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते. यावेळी सब ऑर्डिनेट संघटनेचे उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सहसचिव वाय.सी. भंगाळे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, मंडळ सचिव देवेंद्र भंगाळे, कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी, राजेंद्र मार्के, उपकार्यकारी अभियंता अजय वाणी, एस.के. पाटील, अतुल पाटील, आर.एफ. पवार, डी.पी. धांडे, केशव स्मृती सेवासंस्था समूहाचे सहप्रकल्प प्रमुख संजय काळे, प्रशासकीय अधिकारी सागर येवले, वृद्धाश्रमाचे पवन येपुरे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी चेतन सोनार, एस.डी. चौधरी, अमोल चौधरी, हेमंत खांडेकर, पंकज बाविस्कर, हर्षल नेहेते, मोहन भोई, अविनाश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार राहुल कुलकर्णी यांनी मानले.

Web Title: A banquet with the seniors of the old age home on the occasion of Engineer's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.