बँकांनी मनमानी शुल्क रद्द करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:37+5:302021-02-05T05:53:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : देशातील सर्व बँकांद्वारे नव्याने लावण्यास सुरुवात केलेले चार्जेस बंद करावेत, या मागणीचे ...

बँकांनी मनमानी शुल्क रद्द करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : देशातील सर्व बँकांद्वारे नव्याने लावण्यास सुरुवात केलेले चार्जेस बंद करावेत, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना फॅमच्या माध्यमातून दिल्याची माहिती फॅमचे उपाध्यक्ष ललित बरडिया यांनी दिली आहे.
२० जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी ५० हजार रुपयांच्या जास्त रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी प्रति एक हजार रुपयांना अडीच रुपये चार्ज लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कॅश हँडलिंग चार्ज, चेक रिटर्न चार्ज, क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाईप मशीनसाठी चार्ज, डिजिटल पेमेंट्सवर चार्ज, एनईएफटी, आरटीजीएससाठी चार्ज आदी अनेक प्रकारचे नवीन किंवा वाढीव चार्जेस लावत आहेत. त्यास महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने विरोध केला आहे. बँकांद्वारे लावण्यात येत असलेले हे चार्जेस तत्काळ बंद करावेत, याबाबतचे निवेदन फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता, महासंचालक आशिष मेहता, उपाध्यक्ष ललित बरडिया यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.