जळगाव जिल्ह्यातील सात नगरपालिकांचे बँक खाती गोठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 05:13 PM2017-11-21T17:13:38+5:302017-11-21T17:21:01+5:30

असंघटीत कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा न केल्याने झाली कारवाई

Bank accounts of seven municipal corporations of Jalgaon district frozen | जळगाव जिल्ह्यातील सात नगरपालिकांचे बँक खाती गोठविली

जळगाव जिल्ह्यातील सात नगरपालिकांचे बँक खाती गोठविली

googlenewsNext
ठळक मुद्देभुसावळ, यावल, रावेर, सावदा, वरणगाव, चाळीसगाव व धरणगाव न. पा. चे बँकखाती गोठविलेसध्या रावेर, भुसावळ व यावल नगरपालिकेचे बँक खाती सीलभविष्य निर्वाह निधीच्या न्यायिक प्रशासनाची कारवाई

आॅनलाईन लोकमत
रावेर, दि.२१ : गेल्या सहा वर्षांपासून नगरपालिकांमधील कंत्राटदारांकडील असंघटीत कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाला अदा न केल्याने, केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीच्या न्यायिक प्रशासनाकडून भुसावळ, यावल, रावेर, सावदा, वरणगाव, चाळीसगाव व धरणगाव न. पा. चे बँकखाती गोठविले आहे. सद्यस्थितीत रावेर, भुसावळ व यावल नगरपालिकेचे बँक खाती सील केले आहेत.
सन २०११ पासून संबंधित कंत्राटदारांना तसेच न. पा. प्रशासनाला तत्कालीन समयी निविदा मंजूर करतांना त्या असंघटीत कामगारांचा भविष्य निर्वाह निधी कपात करण्यासंबंधी कुठेही निर्देशित केले नसल्याने सदरच्या रकमा अनायासास अदा झाल्या नव्हत्या.
कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी या न्यायिक प्रशासनाकडून संबंधित न. पा. प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर बँकप्रशासनाशी संपर्क साधून बँक खाती गोठवण्याची कारवाई केली आहे. न पा प्रशासनाने भविष्य निर्वाह निधी या न्यायिक प्रशासनाचे आदेशांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वैयक्तिक दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Bank accounts of seven municipal corporations of Jalgaon district frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.