शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील कार्यालयात केळी फेकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 15:47 IST

रावेर मधील केळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत चार दिवसात न मिळाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी किसान सेलचा इशाराहेक्टरी एक लाख मदतीची मागणीअन्यथा महाजन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

जळगाव : रावेर मधील केळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत चार दिवसात न मिळाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.नुकसान झालेल्या केळी पिकाच्या पाहणीसाठी रावेरला गेलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांच्या दौºयातून सोपान पाटील यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी आपल म्हणणे जनतेसमोर आणण्यासाठी जळगाव येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली.यावेळी सोपान पाटील म्हणाले की, गिरीश महाजन यांना त्यावेळी मी पालकमंत्री का आले नाही? असा प्रश्न विचारल्यामुळे महाजन यांनी संतापून मला दौºयात तुम्ही का आले असा उलट जाब विचारून बाहेर काढले. या अवमानाची पर्वा न करता शेतकºयांच्या प्रश्नाला प्राधान्य देत मी त्यांना पुन्हा प्रश्न विचारले, असेही ते म्हणाले. दरम्यान पालकमंत्री या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणे गरजेचे असताना ते या ठिकाणी आले नाही, पालकमंत्री नेहमीच जिल्ह्यासाठी वेळ देण्यात कमी पडतात, असेही सोपान पाटील म्हणाले.अन्यथा महाजन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावापालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यात येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडेच मदत व पुर्नवसन खाते असल्याने त्यांचा दौरा महत्वाचा होता. परंतू आपल्याला खास मुख्यमंत्र्यांनी पाठविल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनीच पाठविल्यामुळे ते स्वत:च मदत जाहीर करू शकतात, त्यांनी हेक्टरी १ लाखांची मदत द्यावी, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सोपान पाटील यांनी केली.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन