आॅनलाईन लोकमतदापोरा,जि.जळगाव,दि.१७ - गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही.सतत ४५ अंशाच्या वर असलेले तापमानात केळीबागांना कितीही पाणी दिले तरी लगेच सुकणे, पाने करपत आहेत. बागेत सूर्याच्या तीव्र झळा बसतात. रात्रीवेळी पाणी देणे केळी बागांना योग्य असून मात्र विजेच्या समस्यामुळे शक्य होत नाही. आठवड्यातून चार दिवस दिवसा व चार दिवस रात्री अशी आठ तास वीज मिळते. रात्रीवेळी वाहणारे उष्णवारे याचाही फटका बागाना बसून गरम पाणी केळीबागांना जाते.विविध उपाययोजना करून संरक्षणदिवसा उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण व्हावे, जमिनीत ओलावा टिकावा यासाठी शेतकरी वर्ग शेडनेट, घरातील साड्या, तुरखाट्या, उंच वाढणारी शेवरी, मका, हत्ती गवत बागाच्या चौफेर लावून काही प्रमाणात संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजना देखील निष्फळ ठरत आहेत.बांध्यातून निसटलेल्या घळास व्यापारी घेईनाउष्ण वाहणारे वारे, ४५ अंशावरील तापमानामुळे केळी पाने करपली जावून उन्हाच्या तीव्रतेमुळे काढणी योग्य आलेली केळीची घळ रात्रीमध्ये गळून पडतात. यामळे त्यांची ताठरता कमी होते. लवचिक वाटत असल्याने व्यापारी ते नाकारत आहेत. केळीसाठी लागणारा खर्च देखील निघत नाही. प्रत्येक वेळीबागामध्ये दररोज ५ ते १० घळाचे नुकसान होत आहे.
उष्णलहरीमुळे दापोरा परिसरात केळी उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:47 IST
गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही.
उष्णलहरीमुळे दापोरा परिसरात केळी उत्पादक संकटात
ठळक मुद्देउष्ण वा-यापासून केळी बागाचे संरक्षणासाठी लावली जातेय नेटउन्हामुळे काढणीयोग्य केळीच्या बांधातून गळून पडताहेत घळरात्रीवेळी वाहणा-या उष्णवा-यांचा केळी बागांना फटका