फलज्योतिष अभ्यासक्रमावर बंदी आणावी-अंनिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:36+5:302021-07-07T04:21:36+5:30
दीपनगर, ता. भुसावळ : फलज्योतिष अभ्यासक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. जगामध्ये ...

फलज्योतिष अभ्यासक्रमावर बंदी आणावी-अंनिस
दीपनगर, ता. भुसावळ : फलज्योतिष अभ्यासक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
जगामध्ये प्रगतीचे चक्र वेगाने फिरत असताना त्यांची कास व संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याऐवजी त्यांची इच्छाशक्ती बोथट करण्याचे षड्यंत्र सरकार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात सरकारमधील काही तथाकथित शिक्षण तज्ज्ञांनी फलज्योतिष हा अभ्यासक्रम विद्यापीठात लागू करून विद्यार्थ्यांतील नैतिकता बोथट करून समाजाला अधोगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी फलज्योतिष अभ्यासक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भुसावळचे अरुण दामोदर, बुवाबाजी संघर्ष जिल्हा सचिव शांताराम जाधव, शहराध्यक्ष श्यामकुमार वासनिक, राहुल कुचेकर कार्याध्यक्ष सागर बहिरुणे आदींनी केली आहे.