बांबरूड शिवारात बिबट्याने गायीचा पाडला फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:49+5:302021-09-21T04:17:49+5:30

कजगाव (ता. भडगाव) येथून जवळच असलेल्या बांबरूड (ता. भडगाव) येथील शेतकरी गणेश ठाणसिंग परदेशी यांच्या गायीचा बिबट्याने ...

In Bambarud Shivara, a cow was killed by a leopard | बांबरूड शिवारात बिबट्याने गायीचा पाडला फडशा

बांबरूड शिवारात बिबट्याने गायीचा पाडला फडशा

कजगाव (ता. भडगाव) येथून जवळच असलेल्या बांबरूड (ता. भडगाव) येथील शेतकरी गणेश ठाणसिंग परदेशी यांच्या गायीचा बिबट्याने फडशा पाडला. सदर घटनेमुळे पशुधन मालक, शेतकरी, शेतमजूर यांच्यात घबराट पसरली आहे. सदर घटना कळताच वन विभागच्या कर्मचाऱ्याने भेट दिली. या बाबत वन विभागास रीतसर कळविण्यात आले आहे.

कजगाव बांबरूड रस्त्या जवळील कान्होबा टेकडी शेजारील शेतात वास्तव्यास असलेले गणेश ठाणसिंग परदेशी यांच्या शेतात बांधलेल्या त्यांच्या गाईवर १८ च्या रात्री बिबट्याने हल्ला चढविला. यात गाईचा मृत्यू झाला. सदरची घटना पशुमालक गणेश परदेशी यांच्या सकाळी लक्षात आले. घटना सर्वत्र कळल्यानंतर ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर, पशुधन मालक यांच्यात घबराट पसरली आहे. सदर घटना कळल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. याबाबत पशुधन मालक यांनी चाळीसगाव वन विभागास झालेली घटना कळविली आहे.

Web Title: In Bambarud Shivara, a cow was killed by a leopard