बालकवी ठोंबरे यांचे स्मारक अपूर्णच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:57+5:302021-06-21T04:12:57+5:30
धरणगाव : बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीत साकारले जाणारे स्मारक गेल्या दहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधीअभावी रखडले ...

बालकवी ठोंबरे यांचे स्मारक अपूर्णच...!
धरणगाव : बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला, त्या भूमीत साकारले जाणारे स्मारक गेल्या दहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधीअभावी रखडले आहे.
काव्यजगतातून प्रचंड प्रमाणात संतापाची लाट उसळताना दिसून येत आहे.
आश्वासने दिले जातात. मात्र काम रखडलेलेच दिसून येते. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या काळात स्मारकाचे काम सुरू झाले होते.
प्रशासनाने ते पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १३ ऑगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्य प्रतिभा याच भूमीत फुलली. साहित्य कला मंच या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली.
दोन एकर गावठाण जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी
जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारले.
५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव प्रलंबित
स्मारकाची संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२-१३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे बालकवींच्या स्मारकाचे काम रखडले आहे.
स्मारक होणार साहित्यिकांची पंढरी
निसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक साकारले गेल्यास हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक झाल्याशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही. तसेच कोलमडलेला औदुंबर या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी मिळणार आहे.
===Photopath===
200621\20jal_10_20062021_12.jpg
===Caption===
(छाया कल्पेश महाजन)