पारोळा : येथील बालाजी मंदिरात बालाजी महाराजांच्या चरणी २ तोळ्यांचा मुकुट नाशिक येथील बालाजी भक्त संजय त्र्यंबक जोशी यांनी सपत्नीक अर्पण केला. सुमारे ६७ हजार रुपये किंमतीचा हा मुकुट असून आपण नवस बोललो होतो, त्या नवसाची पूर्तता झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गावातील बालाजी भक्त राजेंद्र राजाराम पाटील यांनीही १ ग्रॅमचे एक सोन्याचे पदक बालाजी चरणी आजच अर्पण केले. या दोन्ही भक्तांचा बालाजी बालाजी संस्थानकडुन सत्कार करण्यात आला .
पारोळा येथील बालाजी चरणी सोन्याचा मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:35 IST