शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

"बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही"; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:24 IST

मंत्री पाटील हे सोमवारी सकाळी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते.

- प्रशांत भदाणे

जळगाव : "बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही. मान्य आहे ते उद्धव ठाकरेंचे वडील आहेत. पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल, अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर बरसले आहेत.

मंत्री पाटील हे सोमवारी सकाळी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी काल कोकणातील खेडच्या सभेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

नेमकं काय म्हणाले गुलाबराव?

गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेबांच्या नाव वापरू नका हे उद्धव ठाकरे शिंदे गटाला उद्देशून पाचव्या सहाव्या वेळेस बोलले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी, हे मला तरी वाटतं चुकीचं होईल. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाळासाहेब हे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही. मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंसोबत मी 35 वर्षे राहिलो आहे. त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती आहेत. त्यामुळे आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असा चिमटा देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.

ठाकरे गटाला दिल्या होळीच्या शुभेच्छा -

यावेळी गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला होळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, होळीच्या दिवशी आपण रागाच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी होळीत टाकत असतो. आज आपल्याला मागच्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आहेत. बुरा न मानो होली हैं... मी माझ्या मित्रांना आणि विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतो. विचारांची ही लढाई आहे. या लढाईत फरफटत गेलेला विचार हा यशस्वी शिखरापर्यंत नेत नाही. मूळ बेस आपला हिंदुत्व आहे, तो बेस सोडल्यामुळे हा प्रोब्लेम उभा राहिला आहे. तरी पण होळीच्या दिवशी मला वाईट बोलण्याची मानसिकता नाही, असं म्हणत गुलाबराव यांनी ठाकरे गटाला आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे