बाला रफिक ठरला खान्देश केसरीचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:40 IST2019-08-28T00:36:17+5:302019-08-28T00:40:11+5:30
धरणगाव : येथे मरीआई यात्रोत्सव निमित्ताने श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी ‘खान्देश केसरी’ कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफीक याने भारत ...

बाला रफिक ठरला खान्देश केसरीचा मानकरी
धरणगाव : येथे मरीआई यात्रोत्सव निमित्ताने श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी ‘खान्देश केसरी’ कुस्तीत महाराष्ट्र केसरी बाला रफीक याने भारत केसरी हरयाणाच्या तेजवीर पुनिया याला आसमान दाखवले.
सोलापूरच्या बाला रफिक याच्या विजयाने आखाड्यात जल्लोष झाला. विजयी मल्ल बाला रफीक यांना २ लाख ५१ हजारांचे रोख बक्षीस, खान्देश केसरी किताब आणि गदा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी मनोज वाणी, सरपंच भगवान महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश चौधरी, जीवनसिंह बयस, भैय्या महाजन, अविनाश पाटील, अनिल पाटील, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, उषा वाघ, तहसीलदार मिलिंंद कुलथे पोलीस निरीक्षक पवन देसले, हनुमंत गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, सचिव प्रशांत वाणी, विलास येवले, कमलेश तिवारी उपस्थित होते. पंच म्हणून प्रकाश पाटील, देवीदास महाजन, गुरू वैदू, किशोर महाजन, अरुण कासार यांनी काम पाहिले.
यशस्वीतेसाठी संचालक गोपाळ पाटील, भास्कर मराठे, शरद भोई, सुनिल चौधरी, डॉ.व्ही.आर.तिवारी, डॉ.किशोर भावे यांनी परिश्रम घेतले.