पारोळा येथे बजरंग दलातर्फे शहिदांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:27+5:302021-07-29T04:16:27+5:30
मोठे राममंदिरच्या सभागृहात आरएसएसचे मुकेश चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवृत्त सभुदार हिंमतराव निकम, केशव क्षत्रिय, ...

पारोळा येथे बजरंग दलातर्फे शहिदांना आदरांजली
मोठे राममंदिरच्या सभागृहात आरएसएसचे मुकेश चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवृत्त सभुदार हिंमतराव निकम, केशव क्षत्रिय, विलास वाणी, अनिल टोळकर उपस्थित होते. त्यांच्या हातून सैन्य दलात सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी देवगाव (ता. पारोळा) येथील सुपुत्र निवृत्त सुभेदार हिंमतराव निकम ज्यांनी करगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता, त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना कारगिल युद्धाचा चित्तथरार यावेळी सांगितला. त्यांनी सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून मायभूमीचे रक्षण कसे करतात व सैन्य दलाची शिस्त काय असते, याबाबत माहिती दिली.
युवकांनी भारत मातेच्या घोषणा देऊन सुभेदार निकम यांचा सन्मान केला तर मुकेश चोरडिया यांनी जवानांच्या कार्याचे कौतुक करीत तेच सर्वांचे आदर्श असतात, असे सांगितले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शांताराम शिंदे, बजरंग दलाचे विनोद खाडे, नितीन बारी, भय्या चौधरी, रवींद्र खाडे, विशाल महाजन, धनराज पाटील, मनिष अग्रवाल, समाधान महाजन, समाधान धनगर, आदी जण उपस्थित होते.