बहिणाबाईंचे काव्य म्हणजे जीवन जगण्याचे तत्वज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:24+5:302020-12-04T04:45:24+5:30

००००००००००००००००००००००००० प.वि.पाटील व झांबरे विद्यालयात बहिणाबाई यांना आदरांजली (फोटो आहे) गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय ...

Bahinabai's poetry is the philosophy of living life | बहिणाबाईंचे काव्य म्हणजे जीवन जगण्याचे तत्वज्ञान

बहिणाबाईंचे काव्य म्हणजे जीवन जगण्याचे तत्वज्ञान

०००००००००००००००००००००००००

प.वि.पाटील व झांबरे विद्यालयात बहिणाबाई यांना आदरांजली (फोटो आहे)

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गीत सादर करून बहिणाबाई यांना अभिवादन केले. यावेळी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका रेखा पाटील, योगेश भालेराव, डी.ए. पाटील, देवेंद्र चौधरी, सरला पाटील आदी उपस्थित होते.

०००००००००००००००००००००००००

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ (फोटो आहे)

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई बिग्रेडतर्फे निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, ॲड. रवींद्र पाटील, आशा कोल्हे, प्रदीप भोळे आदीची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमात रवींद्र पाटील, सुनीता नारखेडे, कल्पिता पाटील, हर्षा बोरोले, खेमचंद महाजन, अखिलेश चौधरी, अशोक लाडवंजारी, हर्षल चौधरी, कार्तिक तळेले, धीरज पाटील, विवेक जावळे, सुरेश फालक, अविनाश भोळे, दर्शन भोळे, गौरव चौधरी, तेजस नारखेडे, सागर मराठे, हर्षल अटाळे आदींची उपस्थिती होती. आभार साधना लोखंडे यांनी मानले.

०००००००००००००००००००००००००००००००००

सुजय महाजन प्राथमिक विद्यालय

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांची जयंती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका ए.जी. सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात गौरव शिरसाठ, प्रतीक्षा भोलाणकर, काजल बंजारा, बजरंग तिवारी, रोहिणी सपकाळे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

००००००००००००००००००००

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षिका अर्चना धांडे यांच्याहस्ते दीपप्रज्वालन करून माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रततमेचे पूजन करण्यात आले. तर मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी आॅनलाईन पध्दतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. कृष्णा मराठे, पायल धाडी, संजय मिरचुले, सौरभ पाटील, प्रणाली, गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ, जयेश बाविस्कर, प्रशांत कवळे, स्वाती बाविस्कर, गायत्री कवळे, विजय बाविस्कर, रितेश शिरसाठ, मयूर शिरसाठ आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यशस्वीतेसाठी रूपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, अविनाश महाजन, लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, नरेश कोळी, दीपक भोळे आदी उपस्थित होते.

०००००००००००००००००००

अखिल भारतीय लेवा विकास महासंघ (फोटो आहे)

अखिल भारतीय लेवा विकास महासंघ यांच्यातर्फे बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाई उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ़ स्रेहल फेगडे, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी दीपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी, ललित महाजन, महेंद्र पाटील, बिपीन झोपे, प्रा. सुरेश अत्तरदे, राजेश वारके, प्रा. डॉ. नीलेश पाटील, शैलेश काळे, राजू बढे, विक्की काळे, यतीन रोटे, भरत बेंडाळे, सचिन पाटील, नेमीचंद येवले, हरिष येवले, सचिन ढाके, सुनील बाविस्कर, राहुल चौधरी, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे आदींची उपस्थिती होती.

०००००००००००००००००००

सि. ग. भंगाळे माध्यमिक विद्यालय

भंगाळे माध्यमिक विद्यालयात दीपनंदा पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आॅनलाईन कविता सादर केल्या़ यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भुषण भोळे आदींची उपस्थिती होती़

००००००००००००००००००००

बहिणाबाई माध्यमिक विद्यालय

बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक त्र्यंबक शिवाजी चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राम महाजन तसेच पद्माकर चौधरी, चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण, विलास नारखेडे, संतोष पाटील, राजेश वाणी, दिनेश चौधरी, विशाल पाटील, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, प्रतिभा राणे, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम आदींची उपस्थिती होती.

००००००००००००००००००००००००

खुबचंद सागरमल विद्यालय (फोटो आहे)

खुबचंद सागरमल विदयालयात पहिले राष्ट्रपती डॉ राजेद्र प्रसाद यांची जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतीथी निमित्त प्रतिमेस मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, एल.एन. महाजन, भास्कर कोळी, विजय पवार,भास्कर कोळी, राजेश इंगळे, प्रवीण पाटील, राहुल देशमुख, सुलेमान तडवी, योगीनी बेंडाळे, करूणा महाले,सुनिता येवले आदी उपस्थित होते.

Web Title: Bahinabai's poetry is the philosophy of living life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.