'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल
By Admin | Updated: March 2, 2015 13:07 IST2015-03-02T13:07:30+5:302015-03-02T13:07:30+5:30
बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले.

'अवकाळी'च्या तडाख्याने बेहाल
जळगाव : बेमोसमी पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह परिसरात शनिवारी व रविवारी जोरदार तडाखा दिल्याने नागरिक बेहाल झाले. सलग दुसर्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. या पावसाचा सर्वाधिक तडाखा शिवतीर्थ मैदानावरील मुक्ताई सरसमधील बचत गटांना बसला. तसेच कृषि उत्पन्न बाजारातील धान्याची पोती पाण्याने भिजल्याने नुकसान झाले. तसेच बहुतांश भागातील फीडर ट्रिप झाल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून अनेक भागातील विद्युत पुरवठा रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत खंडित होता. त्यानंतरही दिवसभर विजेचा लपंडाव सुरु होता. ठिकठिकाणी साचले पाण्याचे तळे
शनिवारी रात्री साडेआठ वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा रात्री १ वाजेच्या सुमारास पावसाने जोर धरला. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील सखल भागात ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते.
परिस्थिती पाहून निर्णय घ्या!
रविवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रवीण देवरे यांनी जि.प.चे 'सीईओ' आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संपर्क साधून प्रदर्शनस्थळी व्यावसायिकांचे हाल होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे प्रदर्शन बंद करायचे का? अशी विचारणा केली असता सीईओ पांडेय यांनी तेथील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे सांगितले. प्रदर्शनाच्या ठिकाणी चिखल मोठय़ा प्रमाणात साचला आहे. प्रदर्शनाच्या समारोपाला अद्याप दोन दिवस बाकी असले तरी आता व्यवसाय होणे आता अशक्य आहे. शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे शिवतिर्थ मैदानावर प्रचंड चिखल झाल्याने मुक्ताई सरस महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांचे प्रचंड हाल झाले.
'मुक्ताई सरस'मध्ये सहभागी बचत गटांची झालेली दैना. धान्याचे नुकसान
अजिंठा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेडबाहेर रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या गहू, मका व इतर धान्याच्या गोण्या पावसाच्या पाण्याने भिजल्याने मोठे नुकसान झाल्याची भीती व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
क्रिकेटचे सामने रद्द
सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनतर्फे कन्स्ट्रक्शन क्रिकेट लिगला शनिवारपासून सागर पार्क मैदानावर सुरुवात झाली. पावसामुळे मैदानाची पूर्णत: वाट लागली असून रविवारी दिवसभरात होणार्या दोन उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने रद्द केले आहे. ही स्पर्धा आता बुधवारी होईल, अशी माहिती 'क्रेडाई'चे धनंजय जकातदार यांनी दिली. अवकाळी पावसामुळे मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांचे हाल झाले. अनेक गटांना प्रदर्शन मध्येच सोडून घरी जावे लागले.
-प्रवीण देवरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा व दादरचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही सर्वच पिके हातात आली असताना अवकाळीच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे. ममुराबाद, कानळदा, फुपनगरी, आव्हाणे परिसरातील गहू आडवा पडला आहे. परिणामी यंदा पुन्हा एकदा गहू, हरभर्याची प्रत खराब होणार आहे. आधीच शेतकरी संकटात असताना आता पुन्हा आपत्ती कोसळली आहे. शिवाजीनगर पुलाकडून गेंदालाल मिलकडे जाणार्या रस्त्यावर रविवारी असे पाणी साचलेले होते. १६0 बचत गट घराकडे रवाना प्रदर्शनस्थळी सर्वत्र चिखल झाला होता. येथील परिस्थिती पाहून अनेक विक्रेते आपला माल जमा करून रविवारी सकाळीच घराकडे रवाना होताना दिसून आले. दुपारी दोन वाजेपर्यंत २00 पैकी १६0 बचत गटांनी आपले स्टॉल सोडले होते.
मुक्ताई सरसमधील बचत गटांचा माल भिजला
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे शिवतीर्थ मैदानावर भरलेल्या मुक्ताई सरसमध्ये सहभागी झालेल्या बचत गटांना बसला. दोन पैसे मिळावे यासाठी जिल्ह्याच्या कान्याकोपर्यातून आलेल्या काही बचत गटांचा माल ओला चिंब झाल्याने नुकसान झाले.