शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कानफुक्यांमुळेच खडसेंवर वाईट वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 9:38 PM

पालकमंत्री गुलाबराव पाटील : मोठ्या मनाचे म्हणत केले कौतुकही

भुसावळ - एकनाथराव खडसे हे राजकारणातले आमचे बाप आहेत.ते मोठ्या मनाचेही आहे आणि राजकारणात तसच राहायला पाहिजे. मात्र कानं फुकणाऱ्या लोकांमुळेच नाथाभाऊ आज अडचणीत आले. ज्यांना त्यांनी जवळ केलं त्यांचा रक्त गट कधी तपासला नाही, असा टोला पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे लगावला.पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने रविवारी भुसावळ येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील हे बोलत होते. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा, अ‍ॅड.जगदीश कापडे, सुरजितसिंग गुजराल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, युवराज लोणारी, प्रा.सुनील नेवे, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, पवन सोनवणे तसेच रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते... तर युतीत समेट झाला असतायुती संदर्भात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीनंतर जर देवेंद्र फडणवीस शाल, श्रीफळ घेऊन मातोश्रीवर गेले असते, तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हाच समेट झाला असता. कारण उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नव्हती.पाईलाईनने देणार पाणीयापूर्वी जिल्ह्यात आलेल्या मंत्र्यांनी चारीच्या माध्यमातून पाणी दिले तर मी पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी देणार आहे. आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी असल्याने कुठं कुणावरही अन्याय होऊ देणार नाही मात्र पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू आमदार सावकारे हे साधे व स्वच्छ मनाचे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान सत्कार समारंभासाठी आलेल्या गुलाबराव पाटलांना प्रा.सुनील नेवे म्हणाले की, तुम्ही युतीचे मंत्री झाले असते तर आधिक आनंद झाला असता. उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.दायमा यांना रडू कोसळलेगुलाबराव पाटील म्हणाले की, दरवर्षी दायमा यांच्या वाढदिवसाला भुसावळला येतो, अशा लोकांमुळेच मी घडलो व आज मंत्री झालो या भाषणामुळे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा हे भाऊक झाले व त्यांना व्यासपीठावर रडू कोसळले.सूत्रसंचलन माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले