Bad times on the crickets because of earrings | कानफुक्यांमुळेच खडसेंवर वाईट वेळ
कानफुक्यांमुळेच खडसेंवर वाईट वेळ

भुसावळ - एकनाथराव खडसे हे राजकारणातले आमचे बाप आहेत.ते मोठ्या मनाचेही आहे आणि राजकारणात तसच राहायला पाहिजे. मात्र कानं फुकणाऱ्या लोकांमुळेच नाथाभाऊ आज अडचणीत आले. ज्यांना त्यांनी जवळ केलं त्यांचा रक्त गट कधी तपासला नाही, असा टोला पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे लगावला.
पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने रविवारी भुसावळ येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील हे बोलत होते. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा, अ‍ॅड.जगदीश कापडे, सुरजितसिंग गुजराल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, युवराज लोणारी, प्रा.सुनील नेवे, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, पवन सोनवणे तसेच रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
.. तर युतीत समेट झाला असता
युती संदर्भात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीनंतर जर देवेंद्र फडणवीस शाल, श्रीफळ घेऊन मातोश्रीवर गेले असते, तर आज ही वेळ आलीच नसती तेव्हाच समेट झाला असता. कारण उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नव्हती.
पाईलाईनने देणार पाणी
यापूर्वी जिल्ह्यात आलेल्या मंत्र्यांनी चारीच्या माध्यमातून पाणी दिले तर मी पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी देणार आहे. आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी असल्याने कुठं कुणावरही अन्याय होऊ देणार नाही मात्र पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू आमदार सावकारे हे साधे व स्वच्छ मनाचे आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान सत्कार समारंभासाठी आलेल्या गुलाबराव पाटलांना प्रा.सुनील नेवे म्हणाले की, तुम्ही युतीचे मंत्री झाले असते तर आधिक आनंद झाला असता. उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
दायमा यांना रडू कोसळले
गुलाबराव पाटील म्हणाले की, दरवर्षी दायमा यांच्या वाढदिवसाला भुसावळला येतो, अशा लोकांमुळेच मी घडलो व आज मंत्री झालो या भाषणामुळे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दायमा हे भाऊक झाले व त्यांना व्यासपीठावर रडू कोसळले.
सूत्रसंचलन माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले

Web Title: Bad times on the crickets because of earrings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.