शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

प्रतिकूल परिस्थितीतही सुरू आहे ‘ज्ञानयज्ञ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:46 AM

मराठे आदिवासी शाळा : शिक्षकांना पगार नाही, अनुदान नाही, 14 जण देताहेत सेवा

ठळक मुद्देआदिवासी भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करीत शाळा सुरू 14 शिक्षक विनापगार या मुलांना शिकवतातशाळेला अनुदान हा  विषयच नाही

ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे 

जळगाव, दि. 28 - दान दिल्याने ज्ञान वाढते.. त्या ज्ञानाचे मंदिर हे.. गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या या ओळी.. सातपुडय़ाच्या आदिवासी भागात एक शाळा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करीत सुरू आहे. प्रतिकुलता कशी असू शकते,  इथे गेल्यावरच त्याचा अर्थ कळू  शकेल.. इतके प्रतिकूल. तरीही ज्ञानयज्ञाचे काम अविरत सुरू आहे तेही बाहेरून मिळणा:या मदतीवर.  ही शाळा आहे, आदिवासी जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, लासूर संचलित वीर खॉजा नाईक निवासी आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मराठे, ता.चोपडा (जि. जळगाव) इथली.   14 शिक्षक विनापगार या मुलांना शिकवतात. शाळेला अनुदान हा  विषयच नाही. 300 ते 400 विद्यार्थी इथे निवासी शिक्षण घेत आहेत. पहिली ते नववीपयर्ंत वर्ग इथे भरतात.    मुलांना शाळेत आणण्यासाठी ही शिक्षक मंडळी मुलांच्या घरी जातात आणि त्यांची समजूत घालून शाळेत आणतात. मुले आणि पालकही आनंदी.  कारण इथे दोन वेळच्या जेवणाची सोय होत असते. अर्थात हे सगळे सुरू आहे बाहेरुन मिळणा:या मदतीवर.    निवासी शाळा असली तरी  चारही बाजूने पत्र्याचा आडोसा करून तात्पुरती केलेली बसण्याची व्यवस्था.   संस्थेचे अध्यक्ष गोपाल भिका चौधरी यांनी आपली जमीन विकून मिळालेल्या पैशातून शाळा काढली. त्याच पैशातून आणि बाहेरुन येणा:या मदतीवर शाळेचा दिनक्रम आणि विद्याथ्र्याच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. विद्यादानाचा अवितरत यज्ञ चोपडा आणि परिसरात राहणारे 14  तरूण विद्यादानाचा हा यज्ञ अविरत चालावा म्हणून झटत आहेत.   हे शिक्षक कधी कधी तर चोपडा परिसरात फिरून गहू, तांदूळ व धान्य जमा करून  या मुलांच्या दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करतात. वह्या आणि पुस्तकेही अशीच मागून  जमा केली जातात. ब:याचदा तर एका पुस्तकावरच  भागविले जाते. कपडे, चपला, दप्तर वगैरे सर्व मिळाले तर ठिक नाही तर असेच अनवाणीच.  अशा या प्रतिकूल परिस्थितीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे.  जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ  डॉ. रितेश पाटील हे आदिवासी भागात जाऊन मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य देत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात असताना त्यांना मराठे येथील शाळेची माहिती मिळाली. तिथली स्थिती पाहून त्यांनीही मग मदतीचा हात पुढे केला. सोशल मीडियाची मदत या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरुन या शाळेची माहिती दिली आणि विद्याथ्र्यासाठी मदतीचे  आवाहन केले. त्यांना मग डॉ. राहुल पाटील, डॉ. सुशील मंत्री, दीपक परदेशी यांची साथ मिळाली. एकएक म्हणता जळगाव आणि परिसरातून  पाल्याचे जुने कपडे, वह्या-पुस्तके, कंपास, पेन,  पेन्सिल, दप्तर,  वॉटरबॅग, चप्पल, बूट, स्वेटर,  रेनकोट,  छत्री असे साहित्य जमा होऊ  लागले. बन्साली या तरुण मित्राने 300 गणवेशांची व्यवस्था केली. अनेकांनी धान्य देऊ केले. असे 10 क्विंटल धान्य जमा झाले.  हे सर्व साहित्य मग मराठे येथील शाळेत पोहोचविण्यात आले. यापेक्षाही अधिक मदत मिळवून देण्याचा निर्धार या डॉक्टर्सनी केला आहे.  ज्यांना या ज्ञानयज्ञात सहभागी व्हायचे असेल,  त्यांनी  दुकान नं. 6 ए विंग, तळमजला चौधरी यात्रा कंपनीशेजारी स्टेडियम कॉम्प्लेक्स, जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

असे आहेत सेवाभावी शिक्षक व कर्मचारीमाध्यमिक मुख्याध्यापक- समाधान ढिवरे, विकास राजकुळे, प्राथमिक मुख्याध्यापक- सागर तायडे, विशाल इंगळे, मिलिंद बोरसे, पंकज महाजन, मनीषा पाटील, हर्षल पाटील तसेच कर्मचा:यांमध्ये चंद्रशेखर पाटील, विशाल चौधरी, विवेक जोशी, विजय जोशी, ज्ञानेश्वर धनगर, सरला धनगर, आशा सपकाळे, संगीता पारधी यांचा समावेश आहे. 

आदिवासी भागात मदत देण्याचे काम गेल्या चार वर्षापासून करीत आहे. आतार्पयत अनेक ठिकाणी अशी मदत मिळवून दिली आहे. ती यापुढेही सुरुच राहणार आहे. येत्या 15 दिवसात आदिवासी भागातील 1500 गर्भवती महिलांना हिमोग्लोबीनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. - डॉ. रितेश पाटील, जळगाव

आपण घरात असतो त्यावेळी आपले विश्व कुटुंबापुरते मर्यादित असते. पण इथल्या शाळेत आल्यावर आपण आपलाच नाही; तर जगाचा विचार करू लागतो.. म्हणून आम्हालाही या शाळेचा लळा लागला आहे. - सागर तायडे, मुख्याध्यापक, प्राथमिक, मराठे, ता. चोपडा