दापोरा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:32+5:302021-09-07T04:21:32+5:30
दापोरा, ता.जळगाव : दापोरा ते शिरसोली रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तीन किमीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तत्कालीन ...

दापोरा रस्त्याची दुरवस्था
दापोरा, ता.जळगाव : दापोरा ते शिरसोली रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तीन किमीच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या आमदार फंडातून रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरण तीन कि.मी. रस्त्याचे झाले होते. मात्र त्यानंतर रस्त्याकडे लक्ष न दिल्या गेल्याने अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असल्याने त्यामुळे वेळोवेळी किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दापोरा रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या काटेरी झुडपांमुळेदेखील रस्ता बऱ्याच टिकाणी झाकला जाऊन काही ठिकाणी रस्तादेखील असून नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून काटेरी झुडपे तोडण्याची देखील मागणी होत आहे.
अवैध वाळूचे वाहतुकीमुळे वाढले खड्डे
दापोरा येथील गिरणा नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपश्याची अवजड वाहने नेहमीच भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच रस्त्याचा भरावदेखील खचला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकर रस्त्याची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी होत आहे.
फोटो कॅप्शन :
दापोरा ते शिरसोली रेल्वे पुलाखालील फुलमळानजीक रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यात साचलेले पाणी.