शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:39 IST

जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला ...

जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला घरघर लागली आहे. वह्या, पुस्तके रजिस्टरची विक्री मंदावली असून याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे़ शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे फ क्त दहा ते पंधरा टक्के शालेय साहित्यांची विक्री झाल्याची माहिती शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली़

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. यामध्ये काही प्रमाणात शिथिलता सुध्दा देण्यात आली आहे. दरवर्षी जून महीन्याच्या सुरूवातीला शालेय साहीत्य खरेदीसाठी बाजारात मोठी उलाढाल व्हायची. शालेय साहित्य, बॅग, वह्या, पुस्तके, रजिस्टर, नवीन गणवेश, शूज, रेनकोट, छत्री या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळायची, व्यापारी वर्ग सुध्दा शालेय साहीत्याचा मोठा जमा करून ठेवत असायचे. मात्र, यंदा कोरोनाने थैमान घातल्यामुळे मार्च महिन्यांपासूनच शाळा, महाविद्यालय बंद झाली़ अन् अद्याप ती उघडलेली नाही़इतर किंमती ‘जैसे थे’, मात्र बारावींच्या पुस्तकांच्या किंमतीत वाढमुलांना आवडणारे दप्तर, कंपास बॉक्स, छत्री, रेनकोट या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आॅनलाईन शिक्षणामुळे अजूनही ग्राहक बाजारात फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे पहिली ते अकरावीच्या पुस्तकांसह वही, पेन व इतर शालेय साहित्यांच्या किंमती ‘जैसे थे’ आहेत़ मात्र, बारावीचा अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे नवीन पुस्तकांच्या किंमतीमध्ये पाच ते सहा टक्के वाढ झालेली आहे़ आॅनलाईन शिक्षणामुळे पालक पुस्तक खरेदीसाठी येत आहेत, मात्र इतर वस्तु खरेदीसाठी पालकांची गर्दी होत नसल्याचे पहायला मिळाले़ट्रान्सपोर्ट बंदमुळे पूर्ण माल मिळेना!पहिली ते दहावी पर्यंतची सर्व पुस्तके ही दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे़ अजूनही ट्रान्सफोर्ट नियमित सुरू नसल्यामुळे अवांतर विषयांची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. लॉकडाऊनमुळे पुस्तक विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला असून अजूनही शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नसल्यामुळे ग्राहकांनी शालेय साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू असल्यामुळे याचाही परिणाम जाणवत आहे.शालेय साहित्यांची पंधरा ते वीस टक्के विक्री झालेली आहे़ ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे अपूर्णच शालेय साहित्य उपलब्ध झालेले आहे़ त्यात सम-विषम प्रमाणात दुकान सुरू असल्यामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे़ बारावीची पुस्तके वगळता इतर साहित्यांच्या किंमतींमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही़ लॉकडॉऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे़ - सुबोध नेवे, शालेय साहित्य विक्रेता

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव