धरणगाव नजीक भीषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:48+5:302020-12-04T04:42:48+5:30

दोन मोटारसायकलींना वाहनाची धडक लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरुन येणार्जा अज्ञात वाहनाने धडक दिली. ...

Awful near Dharangaon | धरणगाव नजीक भीषण

धरणगाव नजीक भीषण

दोन मोटारसायकलींना वाहनाची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरुन येणार्जा अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तीन तरुण ठार झाल्याची घटना धरणगावपासून जवळच असलेल्या निशाणे फाट्याजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये मजून होते.

सुना मोहनलाल भिलाला ( २३, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (२०) व दिलीप बारेला (२५ दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मोटारसायकल तीन जण हे साळवा येथून बांभोरीकडे तर अन्य एका मोटारसायकलवरुन तीन जण कासोदा येथून मध्यप्रदेशकडे जात होते. त्याचवेळी निशाणे फाट्याजवळ समोरुन येणार्या वाहनाने या दाेन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. ही धडक इतक्या जोरात होत की, दोन मोटारसायकलीवरील सहा जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

यात सुना भिलाला हा जागीच ठार झाला तर इतर पाच जण जखमी झाले. या जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉ. गिरीष चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी रुग्णालयात एकच गर्दी उडाली होती.

नारायण बारेला, दिलीप बारेला, पिंकी मूहलाल भिलाला (२२, ), संगीता सिताराम भिलाला ( १४ दोघे रा. मध्य प्रदेश), भरत बारेला (२५ रा. साळवा), या पाच जणांवर उपचार करुन जळगावला पाठविण्यात आले. वाटेतच नारायण व दिलीप बारेला यांचा मृत्यू झाला. हे सर्व कापूस जिनिंग मध्ये काम करणारे मजूर होते.

Web Title: Awful near Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.