दिव्यांग गणेश कुमारची सायकलवरून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST2021-07-10T04:12:54+5:302021-07-10T04:12:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अमरावती येथील गणेश कुमार याने सायकलच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे. गणेश कुमार याला ...

Awareness of Divyang Ganesh Kumar on bicycle | दिव्यांग गणेश कुमारची सायकलवरून जनजागृती

दिव्यांग गणेश कुमारची सायकलवरून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अमरावती येथील गणेश कुमार याने सायकलच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे. गणेश कुमार याला पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी आर्थिक मदत केली.

वरुड जि.अमरावती येथील दिव्यांग गणेश कुमार याने राइट टू फाइट कोरोना हे मिशन घेऊन देशभरात भ्रमंती केली. त्यानंतर, परत जात असताना ते जळगावला आले. कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये, म्हणून जनजागृती करत आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी हे मिशन सुरू केले. जळगावात सायकलिंगची चळवळ रुजविणारे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी गणेश कुमार यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घालून दिली. पालकमंत्र्यांनी गणेश कुमार याचा सत्कार करून त्याला आर्थिक मदत केली, तसेच त्याच्या जिद्दीचे कौतुकही केले. यावेळी ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या काळात भल्याभल्यांनी हिंमत सोडून दिली. गणेश यांच्यासारखा युवक हा दिव्यांग असतानाही तडफेने जनजागृतीचे काम करत आहे.’

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक गणेश सोनवणे, अमर जैन, अनिल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

Web Title: Awareness of Divyang Ganesh Kumar on bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.