खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:27+5:302021-05-05T04:26:27+5:30
आर्थिक व्यवहारासाठी बँकांनी वेळ वाढविण्याची मागणी जळगाव : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांतर्फे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सकाळी १० ते ...

खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती
आर्थिक व्यवहारासाठी बँकांनी वेळ वाढविण्याची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांतर्फे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या वेळेत होणाऱ्या गर्दीमुळे अनेक ग्राहकांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते. तरी बँकांनी त्यांची ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारासाठी वेळ वाढविण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
सरकता जिना वर्षभरापासून बंदच
जळगाव : कोरोनामुळे जळगाव रेल्वे स्टेशनवरील सरकता जिना वर्षभरापासून बंद असल्याने, दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना स्टेशनवर जाण्यासाठी दादरावरून चढून जावे लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
अँटिजन चाचणी केंद्रावर पोलीस नियुक्त करण्याची मागणी
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर अँटिजन चाचणी केंद्रावर पोलिसांची नियुक्ती नसल्याने, काही प्रवासी पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर थेट पळ काढतात. गेल्या आठवड्यात असाच प्रकार स्टेशनवर घडला. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने स्टेशनवरील अँटिजन केंद्रावर पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
जीआरपी पोलीस चौकीतील दूरध्वनी सेवा बंद
जळगाव : रेल्वेस्टेशनवर बाहेरील जीआरपी पोलीस चौकीत गेल्या काही दिवसांपासून दूरध्वनी सेवा बंद पडली आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ दूरध्वनी सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.