५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST2021-09-15T04:20:34+5:302021-09-15T04:20:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा व ...

५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा व दहावी-बारावी, निबंध स्पर्धा बक्षीस वितरण व गुणगौरव कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी रफिक जमील शेख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठातील प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मधुलिका सोनवणे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते ५१ शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेतील सहा विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर इयत्ता दहावी व बारावीतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी मजीद जकेरिया, एजाज मलिक, ॲड. शहेबाज शेख, किशोर सूर्यवंशी, अहमद हुसैन, शीतल जडे, गनी मेमन, मजीद जकेरिया, गायत्री शिंदे, अजमल शाह, सुरेश सोनवणे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शकीर यांनी केले, तर आभार अकिल पहेलवान यांनी मानले.