चाळीसगावला प्राणायाम करून योगाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:50+5:302021-06-22T04:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : कोरोनाच्या सावटातही सुरक्षित अंतरात सोमवारी प्रसन्न सकाळी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

चाळीसगावला प्राणायाम करून योगाचा जागर
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोनाच्या सावटातही सुरक्षित अंतरात सोमवारी प्रसन्न सकाळी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांनी योगासने करताना प्राणायामही केला. ऑनलाइनही योगासने झाली.
पोस्टात टपाल शिक्क्याचे अनावरण
जागतिक योग दिनानिमित्त पोस्ट कार्यालयात ऑनलाइन कार्यक्रमात टपाल शिक्क्याचे अनावरण सहायक डाक अधीक्षक एन. एस. जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी योग शिक्षक गणेश महाजन यांनी कर्मचाऱ्यांकडून योगासने करून घेतली. शहरी व ग्रामीण भागातील पोस्टमन यांच्यासह १८९ कर्मचारी सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. ई. बडगुजर यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी मनोज करंकाळ यांनी सहकार्य केले.
व्ही. एच. पटेल विद्यालयात योग जागर
व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात सकाळी ७.३० वाजता शिक्षकांनी सुरक्षित अंतर पाळून योगासने व प्राणायाम केला. मुख्याध्यापक भगवान शिंगाडे यांनी योग व भारत यांचे उद्बोधन करताना जागतिक स्तरावर योगाचे महत्त्व कसे आहे, याबाबत माहिती दिली. योग शिक्षक सुभाष पिंगळे यांनी योगासने करताना शिक्षकांना मार्गदर्शन केले. एक तास योगाभ्यास करण्यात आला.
जि. प. शिक्षकांचा ऑनलाइन योग
जागतिक योग दिनानिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन सोहळ्याचे आयोजन केले होते. यात तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, नगर परिषद, उर्दू शाळांमधील शिक्षकही सहभागी झाले होते. योग शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी प्रास्ताविकात ‘योग आणि शरीरसुदृढता’ यावर मौलिक उद्बोधन केले.
सम्राट विद्यालयात ऑनलाइन योगाभ्यास
सम्राट विद्यालयात योग दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शर्मा, व्ही. के. गायकवाड व वाय. एस. कामडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. ए. खलाने उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. डी. महाजन व सर्व शिक्षक उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी योग सराव केला. दररोज योगसाधना करून जीवन सुखी ठेवू या, असा सर्वांनी निर्धार केला.
योग वर्गात ५२ साधकांचा सहभाग
शेट नारायण बंकट वाचनालयात गेली ४४ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या योग वर्गात सोमवारी ५२ साधकांनी नेहमीप्रमाणे आपली योगसाधना केली. यानंतर प्राणायाम व प्रार्थना घेण्यात आली. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे व त्यांच्या पत्नी मीनाक्षी चंद्रात्रे हा योग वर्ग मोफत घेतात. योग वर्गाचे हे यंदाचे ४५वे वर्ष सुरू आहे.
===Photopath===
210621\21jal_1_21062021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव येथील सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयात योगासने करताना मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. (छाया : जिजाबराव वाघ)