निबंध, वक्तृत्व स्पर्धेतून राष्ट्रभाषा हिंदीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:14+5:302021-09-15T04:21:14+5:30
जळगाव : हिंदी दिनानिमित्त शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध, वक्तृत्व, गीतगायन, कथाकथन स्पर्धा ...

निबंध, वक्तृत्व स्पर्धेतून राष्ट्रभाषा हिंदीचा जागर
जळगाव : हिंदी दिनानिमित्त शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निबंध, वक्तृत्व, गीतगायन, कथाकथन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या, तर ऑनलाइन कार्यक्रमातून शिक्षकांनी हिंदी दिनाचे महत्त्व पटवून दिले.
पुष्पावती गुळवे विद्यालय
पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीची विद्यार्थिनी लक्ष्मी चव्हाण हिने हिंदी दिनाबद्दल माहिती दिली. त्यानंतर पाचवी ते दहावीच्या वर्गांचे तीन गटांत निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एच.आर. पाटील, पर्यवेक्षक डी.आर. माळी, ए.आर. संदानशिव, के.एस. नारखेडे, के.एम. पाटील, एच.बी. तळेले आदींची उपस्थिती होती.
०००००००
कमल राजाराम वाणी बालनिकेतन (१५ सीटीआर ३१)
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कवी हरिवंशराय बच्चन, महादेवी वर्मा, निराला यांच्या कविता सुरक्षा प्रधान, वैष्णवी सोनवणे, हर्षल सोनवणे यांनी सादर केल्या, तर लेखक प्रेमचंद मुन्शी, मैथिलीशरण गुप्त यांच्या कथा पायाल राठोड, रोहिणी बारी, खुशबू सैनी यांनी सादर केल्या. सूत्रसंचालन संगीता निकम यांनी केले, तर वंदना नेहते, उज्ज्वला जाधव, रशिदा तडवी, सुवर्णा सोनार, श्रीकांत पाटील, राजेंद्र पवार, भूषण बऱ्हाटे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
००००००००
आर.आर. विद्यालय
आर.आर. विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक डी.टी. पाटील होते, तर प्रमुख म्हणून ज्येष्ठ शिक्षक जी.जे. सोनवणे, द्वारकाधीश जोशी, व्ही.एस. बिंदवाल आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस.एस. पाटील यांनी केले, तर आभार के.आर. वंजारी यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक परेश श्रावगी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी तीन गटांत निबंध स्पर्धा घेण्यात आली.
००००००००
रायसोनी विद्यालय
बीयूएन रायसोनी विद्यालयात ऑनलाइन कार्यक्रम पार पडला. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हिंदी राष्ट्रभाषेचे महत्त्व सांगितले. यावेळी कार्यक्रमात संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, रेखा कोळंबे, मीना पाटील, योगेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.