पीकविमा रक्कम देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:25+5:302021-09-05T04:21:25+5:30
रावेर, जि. जळगाव : फळपीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने बँकेच्या आणखी दोन शाखा व्यवस्थापकांविरुद्ध सावदा पोलिसात ...

पीकविमा रक्कम देण्यास टाळाटाळ
रावेर, जि. जळगाव : फळपीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने बँकेच्या आणखी दोन शाखा व्यवस्थापकांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या बँक व व्यवस्थापकांची संख्या आता नऊ झाली आहे.
बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक राम रहिश यादव व गणेश तळेले अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी रावेर तालुक्यातील पाच शाखा व्यवस्थापक तसेच मुक्ताईनगरातील दोन बँका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
हवामानावर आधारित पुनर्रचित पीक विमा योजनेत नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यातच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कृषी खात्यातर्फे याबाबत दिरंगाई होत असल्याचे गेल्या आठवड्यात झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत हा मुद्दा गाजला. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच गुन्हे दाखल होतील, अशी ग्वाही दिली होती. यानुसार सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर येथील प्रभारी कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि देवीदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. उमेश पाटील हे करीत आहेत.