शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

कुंभारी खुर्द येथे शेत जमिनीची फेरफार होण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 5:57 PM

शेतकºयांनी साडे तीन लाखांचा नजराणा भरल्यानंतरही पाच महिन्यांपासून सुरु आहे पायपीट

ठळक मुद्देनवीन अविभाज्य शर्तीची जमिनतीन लाख ६० हजारांचा भरला नजराणापाच महिन्यांपासून शेतकºयांची पायपीट

आॅनलाईन लोकमतवाकोद ता. जामनेर,दि.१० : कुंभारी खुर्द येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिन खरेदी शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया पूर्ण करीत शेत जमिनीची फेरफार होण्यासाठी जामनेर तहसील कार्यालयाकडून विलंब होत आहे. या जमिनीच्या नजराणापोटी तीन लाख ६० हजारांचा भरणा केल्यानंतरही पाच महिन्यांपासून शेतकºयांची पायपीट सुरुच आहे.जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द येथील गट नं. ६९/१/१ क्षेत्र १.१९ व ६९/१/२ क्षेत्र ०.८५ आर ही एकाच गटातील जमीन आहे. ही शेत जमीन वाकोद येथील शेतकरी शंकर दांदडे व सुभाष लोढा यांनी शासनाची पूर्व परवानगी घेवून रंगलाल बाबू राठोड व गोपाल रंगलाल राठोड यांच्या कडून रितसर खरेदी केली. मात्र गेल्या पाच महिन्यापासून तोंडापूर तलाठी यांच्या कडून दफ्यावर मालकी हक्कात नाव लावण्यासाठी विलंब होत आहे. नविन अविभाज्य शर्तीची जमीन असलेल्या या शेतीची शासनाची पूर्व परवानगी घेवूनच खरेदी विक्री केली जाते. खरेदीच्या पूर्व परवानगी साठी शासनाकडून नजराना स्वरुपात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये चलन स्टेट बँकेत भरून रितसर दुय्यम निबंधक जामनेर येथे खरेदी केली. खरेदी नंतर ही शेत जमीन मूळ मालकाच्या नावावरून खरेदीदार यांच्या नावावर लावण्यासाठी संबधीत तलाठी यांच्या कडे गेल्या पाच महिन्यांपासून देवून देखील फेरफार नोंद न घेता मालकी हक्कात लावण्यात आलेले नाही.

 शासनाला नजराना स्वरुपात लाखो रुपये भरले आहे. नियमा प्रमाणे खरेदी करून मालकी हक्कात दप्तरी नाव लावण्यासाठी तलाठी यांना दिले आहे. मात्र हेतुपुरस्कर विलंब केला जात आहे.- शंकर दांदडे , शेतकरीभोगवटा वर्ग २ च्या जमीन खरेदी मध्ये आॅनलाइन थम्ब चा प्रॉब्लम होता. ही समस्या दूर झाली आहे. सद्यस्थितीत नोंद घेण्यास हरकत नाही. संबधित तलाठी यांच्याकडून माहिती घेतो.-परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार, जामनेरआतापर्यंत या नोंदबद्दल आपल्याकडे काही एक माहित आली नाही.-एम. डी. मोतिराय, मंडळाधिकारी, तोंडापूर