रिक्षा चालकाचा तापी नदीत बुडून मृत्यू

By Admin | Updated: June 4, 2017 12:30 IST2017-06-04T12:30:23+5:302017-06-04T12:30:23+5:30

नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला़ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली़

The autorickshaw driver drowned in the Tapi river | रिक्षा चालकाचा तापी नदीत बुडून मृत्यू

रिक्षा चालकाचा तापी नदीत बुडून मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.4 - नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा नदीत बुडाल्याने मृत्यू झाला़ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मृतदेहाचा दुपारपासून सुरू असलेला शोध रात्री 12 वाजेच्या सुमारास थांबला़ नईम रज्जाक शाह (33, ईदगाह रोड, पेट्रोल पंपासमोर, भुसावळ) असे मयताचे नाव आह़े
नईम यांच्यासह त्यांचा मित्र तापी नदीवर पोहण्यासाठी शनिवारी गेले होत़े दोन्ही जण तापी पात्रात उतरले मात्र नईम हे काही अंतरावर पुढे अंघोळ करीत असताना अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मित्राने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर ते पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यानंतर रात्री शोध सुरू करण्यात आला़ रात्री 12 वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला़ शहर पोलिसात अक्रम रहिम पिंजारी (वय 24 लाल बिल्डांगजवळ, भुसावळ) यांन खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़  

Web Title: The autorickshaw driver drowned in the Tapi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.