शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कागदपत्रांसह आॅडिट रिपोर्ट मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 23:44 IST

जळगाव : आऱ आऱ विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या १६ लाख ८२ हजार ४०० रूपयांची रक्कम शाळेच्या बँक खात्यात न ...

जळगाव : आऱ आऱ विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या १६ लाख ८२ हजार ४०० रूपयांची रक्कम शाळेच्या बँक खात्यात न भरता परस्पर गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी बडतर्फ मुख्याध्यापकांसह आॅडिट रिपोर्ट व इतर महत्वाची कागदपत्रे मागविली आली आहे़ याबाबतचे पत्र आऱआऱ विद्यालयाला प्राप्त झाले आहे़रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विजय सखाराम रोकडे यांनी फिर्यादीत नमूद केल्या प्रमाणे, संशयित बडतर्फ मुख्याध्यापक दगडू सुदाम सरोदे, विजया कैलासचंद्र काबरा, भरत रघुनाथ बसेर आणि निर्मला गणेश पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे संशयितांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या ५३२ विद्यार्थ्यांकडून प्रत्येक दीड हजार प्रमाणे ७ लाख ९८ हजार रुपये तसेच नवीन प्रवेशीत व मागील वषार्पासून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असे एकूण २ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्रत्येकी ३०० रुपया प्रमाणे ८ लाख ८४ हजार ४०० रुपये अशी एकूण १६ लाख ८२ हजार ४०० रुपयांची वसुली केली आहे.मात्र, विद्यार्थी व पालकांना घेतलेल्या रकमेची पावती न देता संगनमताने कट कारस्थान रचून ती रक्कम हडप केली.विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक असताना चौघांनी या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.अपहार प्रकरणाचा तपास हा जिल्हापेठचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांना सोपविण्यात आला आहे़ अपहार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांकडून १२ नोव्हेंबर रोजी तपासात आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे़ त्यामध्ये १० मुद्यांवर आधारित माहिती मागविण्यात आली आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव