लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम

By Admin | Updated: October 7, 2015 00:17 IST2015-10-07T00:17:14+5:302015-10-07T00:17:14+5:30

धुळे : महालेखापाल यांच्या पथकाने 1966 पासून आतार्पयत केलेल्या लेखापरीक्षणात मोठय़ा प्रमाणात त्रुटी व आक्षेप निघाले आहेत़.

Audit errors are ignored | लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम

लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम

धुळे : स्थानिक लेखापरीक्षकांसह मुंबई येथील महालेखापाल यांच्या पथकाने 1966 पासून आतार्पयत केलेल्या लेखापरीक्षणात मोठय़ा प्रमाणात त्रुटी व आक्षेप निघाले आहेत़ लेखापरीक्षणातील त्रुटी दूर कराव्यात यासाठी जेव्हा लेखापरीक्षण झाले त्यातही प्रचंड त्रुटी निघाल्या आहेत़ परिणामी जून महिन्यात लेखा विभागाने सर्व विभागप्रमुखांना आपापल्या विभागातील त्रुटी दूर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ मात्र एकाही विभागाने त्रुटी दूर केलेल्या नाहीत़ त्यामुळे लेखा विभागाने पुन्हा एकदा त्रुटी दूर करण्याबाबत सूचना दिल्या असून बुधवारी विभागप्रमुखांची बैठक बोलाविण्यात आली आह़े

नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यापासून लेखापरीक्षण नियमित झालेले नाही़ स्थानिक लेखापरीक्षकांनी महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून केवळ 2011-12 ला लेखापरीक्षण केले आह़े तर महालेखापाल, मुंबई यांच्या पथकाने यापूर्वी 2006, 2008, 2010 व 2012 ला लेखापरीक्षण केले आह़े त्यात 72 गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत़

विभागप्रमुखांचे दुर्लक्ष

महापालिका प्रशासनाने जून महिन्यात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन लेखापरीक्षणातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र विभागप्रमुखांनी दखल न घेतल्याने त्रुटींना उत्तरे देण्यात आलेली नाही़ त्यामुळे उपमुख्य लेखापरीक्षक माधव सराई यांनी वारंवार सर्व विभागप्रमुखांना स्मरणपत्रेदेखील दिली आहेत़ मात्र कार्यवाही न झाल्याने याबाबत बुधवारी सकाळी विभागप्रमुखांची बैठक बोलाविण्यात आली असून त्यात लेखापरीक्षणातील त्रुटी गांभीर्याने घेण्याची ताकीद दिली जाणार असून एक महिन्यात सर्व त्रुटी दूर करण्याचे आदेशही दिले जाणार असल्याचे सांगण्यात आल़े

गंभीर त्रुटी अंगाशी येणार

लेखापरीक्षणातील त्रुटींची दुरुस्ती न केल्यास सर्व विभागप्रमुखांसह कर्मचा:यांच्याही ते अंगाशी येऊ शकत़े शिवाय लेखापरीक्षणातील त्रुटींमुळे मनपाचे जेवढे नुकसान झाले आहे, ते अधिकारी, कर्मचा:यांकडून वसूल करण्याचेही आदेश दिले जाऊ शकतात़ त्यामुळे महिनाभरात सर्व विभागप्रमुखांनी लेखापरीक्षणातील त्रुटी दूर करणे आवश्यक आह़े

जुन्या त्रुटी वगळाव्यात

लेखापरीक्षणातील त्रुटींमध्ये 1966 पासूनच्या त्रुटींचा समावेश आह़े मात्र इतके जुने दस्तावेज मनपाकडे उपलब्ध असणे अशक्य आह़े त्यामुळे महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वीचे आक्षेप वगळण्यात यावे, अशी मागणी मनपा प्रशासनाकडून लेखा संचालनालयाकडे केली जाणार आह़े अन्य त्रुटींची पूर्तता केली जाणार

आह़े

 

अशी आहे लेखापरीक्षणाची स्थिती़़़़

मुंबई येथील महालेखापाल यांच्या पथकाने 2006, 2008, 2010 व 2012 ला लेखापरीक्षण केले आह़े लेखा संचालनालयाकडून दर दोन वर्षाने लेखापरीक्षण करणे अनिवार्य असूनही 2003 ला महापालिका निर्मितीनंतर लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होत़े मात्र त्यानंतर 2012 र्पयत ते नियमित करण्यात आल़े या लेखापरीक्षणात 72 परिच्छेदात त्रुटी आढळून आल्या आहेत़ त्यांनी केलेल्या लेखापरीक्षणाचा कालावधी 1 एप्रिल 2006 ते 31 डिसेंबर 2012 र्पयतचा आह़े या लेखापरीक्षणात आढळलेल्या 72 त्रुटींनाही महापालिकेच्या विभागप्रमुखांनी उत्तरे दिलेली नाहीत़ तर लोकल फंड ऑडिट अॅक्टनुसार दरवर्षी लेखापरीक्षण करणे आवश्यक असतानाही 2003 नंतर लेखापरीक्षण केवळ 2011-12 या वर्षीच झाले आह़े महापालिका स्थापनेपासून एकदाच हे लेखापरीक्षण करण्यात आले आह़े यापूर्वी 2003 र्पयत म्हणजेच नगरपालिका अस्तित्वात असेर्पयत लोकल फंड ऑडिट अॅक्टनुसार आवश्यक लेखापरीक्षण नियमित होत़े 2003 र्पयतच्या लेखापरीक्षणात 1 हजार 411 त्रुटी आढळल्या असून त्यांनादेखील उत्तरे देण्यात आलेली नाहीत. शिवाय 2011-12 मध्ये लोकल फंड संचालकांकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात 184 त्रुटी आढळून आल्या आहेत़

Web Title: Audit errors are ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.