शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

सुवर्णमयी नटसम्राट नाट्यअभिवाचनाने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:01 IST

साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्‌घाटन 

जळगाव - मूळजी जेठा महाविद्यालयाच्या साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाचे उद्‌घाटन बुधवारी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळेस नटसम्राट या नाटकाला रंगभूमीवर येण्यास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमयी नटसम्राट या नाट्यअभिवाचनाचा प्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यअभिवाचनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शाहीर विनोद ढगे, संस्कारभारतीचे मोहनत रावतोळे व ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी प्रास्ताविक केले.आणि प्रेक्षकांची मिळविली दादकार्यक्रमात गणेश सोनार आणि प्रतिमा याज्ञिक यांनी साकारलेल्या वाचिक अभिनयाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः नटसम्राटमधील गणेश सोनार यांनी वाचलेल्या स्वगताना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. त्यांच्यासोबत नाट्यअभिवाचनात दीपक महाजन, हेमलता चौधरी, नेहा पवार, संस्कृती पवनीकर, अमोल ठाकूर, चंद्रकांत चौधरी, विकास वाघ आदी कलावंतांचा सहभाग होता. या नाट्यअभिवाचनाचे दिग्दर्शक चिंतामण पाटील हे होते तर तांत्रिक बाजूंमध्ये प्रकाशयोजना पियुष रावळ, संगीत दर्शन गुजराथी, रंगमंच व्यवस्था दिनेश माळी, कपिल शिंगाणे, देवेंद्र गुरव, सिध्दांत सोनवणे,उमेश सोनवणे आणि नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थ्यांची होती. अभिवाचनासाठी नाट्यशास्त्र विभागप्रमुख हेमंत पाटील यांचे सहकार्य लाभले.चळवळ लोकांपर्यंत पोहचण्यासाठी निश्चितच बळ मिळणारसांस्कृतिक चळवळ वृध्दींगत होण्याकरिता मूळजी जेठा महाविद्यालयाचे मोठे योगदान असून, आता साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास निश्चितच बळ मिळेल, असे विनोद ढगे यांनी मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोपीचंद धनगर यांनी तर आभार डॉ.विलास धनवे यांनी मानले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव