पोलीस ठाण्यात जप्त बेवारस वाहनांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:22+5:302021-06-04T04:14:22+5:30
भुसावळ : बाजारपेठ, शहर, तालुका, नशिराबाद पोलीस स्टेशन मिळवून १२५ बेवारस वाहनांचा लिलाव १६ जून रोजी सकाळी १० वाजता ...

पोलीस ठाण्यात जप्त बेवारस वाहनांचा लिलाव
भुसावळ : बाजारपेठ, शहर, तालुका, नशिराबाद पोलीस स्टेशन मिळवून १२५ बेवारस वाहनांचा लिलाव १६ जून रोजी सकाळी १० वाजता भुसावळ येथील पोलीस वसाहत आरपीडी रोड येथे होणार आहे. ज्यांची ही वाहने असतील त्यांनी १५ जूनपर्यंत मालकी हक्क सिद्ध करून वाहने घेऊन जावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.
वर्षानुवर्षांपासून पोलीस ठाण्यांमध्ये पडलेली बेवारस वाहने मूळमालकांना वाहने परत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणीही बेवारस वाहनावर अद्याप हक्क सादर केलेला नाही. यामुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन - ७०, शहर पोलीस स्टेशन - ५, तालुका पोलीस स्टेशन - १०, नशिराबाद पोलीस स्टेशन- ४० अशी एकूण १२५ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहे. यामुळे पोलीस ठाण्याची जागा अडून पडलेली, पोलिसांनाही जागेअभावी त्रास सहन करावा लागतो व परिसर अस्वच्छ राहतो.
यासाठी बेवारस वाहनांचा लिलाव करून विल्हेवाट लावण्याचे व यातून प्राप्त रक्कम शासनाला जमा करण्याचे निश्चित झाले आहे. ज्यांनाही लिलावामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी १३ जूनपर्यंत शहर पोलीस स्टेशन भुसावळ किंवा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये लेखी अर्ज करावा. तसेच ज्यांनाही वाहनांवर आपला मालकी हक्क सिद्ध करायचा आहे त्यांनी १५ जूनपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन येथे आपल्याकडील मूळ कागदपत्रांसह हजर राहावे. तसेच घेतलेली वाहने हे भंगारात देणे अपेक्षित आहे. त्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत करता येणार नसल्याचेही यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.