शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 20:56 IST

दहा महिन्यांचा खंड : पाचवी ते आठवीच्या १९७८ शाळा सुरू

जळगाव : तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी ३ लाख ३४ हजार ८६२ विद्यार्थ्यांपैकी ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५८ शाळांपैकी बुधवारी पहिल्या दिवशी १९७८ शाळा सुरू होवून ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून व त्यांचे तापमान मोजून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र सुध्दा विद्यार्थ्यांकडून गोळा करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनी एक दिवसाआधी वर्गांमध्ये निर्जुतुकीकरण फवारणी करून वर्ग स्वच्छ केले होते. बुधवारी मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिण भेटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर सुध्दा आनंद झळकत होता.- पहिल्या दिवशी उपस्थितीविद्यार्थी - ८२९६६शिक्षक - ११९६९शाळा सुरू - १९७८पहिला दिवस मज्जेचातब्बल दहा महिन्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी शाळेत प्रवेश केला. त्यामुळे खूप दिवसांपासून मित्र-मैत्रिण न भेटल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.शाळा सुटल्यावर एकमेकांची आरोग्याबाबत विचारणा करताना सुध्दा चिमुकले विद्यार्थी दिसून आले.८० शाळा उघडल्याच नाही...जिल्ह्यात २०५८ शाळांपैकी १९७८ शाळा उघडल्या.मात्र, ८० शाळा पहिल्या दिवशी उघडल्याच नाही.प्राथमिक विभागातंर्गत ११९२ पैकी ११८५ तर माध्यमिक विभागातंर्गत असलेल्या पाचवी ते आठवीच्या ८६६ शाळांपैकी ७८९ शाळा सुरू सुरू झाल्या आहेत़ तसेच माध्यमिक विभागातंर्गत येणाऱ्या शाळांमधील ६ हजार ११४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.आतापर्यंत ३ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटीव्ही आढळून आला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव