तिसºया टप्प्यातील सुनावणीस १२ नगरसेवकांची हजेरी
By Admin | Updated: February 28, 2017 00:11 IST2017-02-28T00:11:56+5:302017-02-28T00:11:56+5:30
जळगाव : तत्कालीन न.पा.ने राबविलेल्या घरकूल योजनेमुळे नपाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेल्या तत्कालीन नगरसेवकांची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे.

तिसºया टप्प्यातील सुनावणीस १२ नगरसेवकांची हजेरी
जळगाव : तत्कालीन न.पा.ने राबविलेल्या घरकूल योजनेमुळे नपाचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवलेल्या तत्कालीन नगरसेवकांची सुनावणी आयुक्तांकडे सुरू आहे. त्यात सोमवारी तिसºया टप्प्यात १२ नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात हजेरी लावली. दरम्यान त्यांच्या वकीलांनी सर्वांचे वकीलपत्र सादर करीत वेळ मागून घेतल्याने २२ मार्चला सुनावणी होणार आहे.
तत्कालीन नगरपालिकेने राबविलेल्या घरकूल, मोफत बससेवा आदी विविध योजनांचे ठराव मंजूर करणाºया ४८ नगरसेवकांवर या योजनांमुळे नगरपालिकेचे ६० कोटींच्या नुकसानीचा झाल्याचा ठपका आहे. २०१३ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर याबाबत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र कोर्टाने त्यास स्थगिती दिली होती. त्यावर मनपाने नंतर अपील केल्याने न्यायालयाने स्थगिती उठविली होती. याबाबत नगरसेवकांच्यावतीने न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर न्यायालयाने नगरसेवकांची नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
वकीलांनी मागितली मुदत
सोमवारी तिसºया टप्प्यात दत्तू कोळी, चत्रभुज सोनवणे, भगत बालाणी, अरूण शिरसाळे, मिना मंधान, सुनंदा चांदेलकर, मुमताजबी हुसेन खान, अलका लढ्ढा, सिंधूताई कोल्हे, सुधा काळे, साधना कोगटा, विमल बुधो पाटील या १२ नगरसेवकांनी आपल्या वकीलांसह आयुक्तांकडे हजेरी लावली. अॅड.डी.एच. परांजपे व अॅड.समदडीया यांनी वकीलपत्र सादर करीत मुदत मागितली. त्यानुसार सुनावणीसाठी २२ मार्च ही तारीख देण्यात आली.