३० दिवसात हजर व्हा; अन्यथा फरार घोषीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST2021-02-09T04:18:23+5:302021-02-09T04:18:23+5:30

जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील ...

Attend within 30 days; Otherwise will declare absconding | ३० दिवसात हजर व्हा; अन्यथा फरार घोषीत करणार

३० दिवसात हजर व्हा; अन्यथा फरार घोषीत करणार

जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर या दोघांना न्यायालयाने तीस दिवसात पोलिसांकडे हजर व्हा, अन्यथा फरार घोषीत केले जाईल, असा इशारा वजा आदेशच दिला. पुणे विशेष न्यायालयाचे न्या. एस.एस.गोसावी यांनी सोमवारी हे आदेश काढल्याची माहिती सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी ‘लोकमत’ ला दिली.

पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह ग्रामीणमधील दोन अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. ठाकरे, जैन, सांखला, वाणी व कंडारेचा चालक यांना अटक झाली आहे. त्यानंतर सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. कंडारे व झंवर मात्र दोघही गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. दोघांविरुध्द वारंटही काढण्यात आले होते, तरी देखील ते हजर झाले नाहीत. त्यामुळे या दोघांना फरार घोषीत करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु करण्यात आली. सरकार वकिलांनी त्यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे, त्यावर न्या.गोसावी यांनी ३० दिवसात दोघंही हजर झाले नाहीत तर फरार घोषीत करण्याबाबतचे घोषणापत्र प्रसिध्द करण्याचे आदेश जारी केले.

Web Title: Attend within 30 days; Otherwise will declare absconding