शिवाजीनगरात घरफोडीचा प्रयत्न; आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:13+5:302021-03-28T04:16:13+5:30
जळगाव : शिवाजीनगर हुडको परिसरात घरफोडीच्या प्रयत्न करणाऱ्या हकीम नूर मोहंमद शहा (वय २१, रा. गेंदालाल मिल) याला ...

शिवाजीनगरात घरफोडीचा प्रयत्न; आरोपीस अटक
जळगाव : शिवाजीनगर हुडको परिसरात घरफोडीच्या प्रयत्न करणाऱ्या हकीम नूर मोहंमद शहा (वय २१, रा. गेंदालाल मिल) याला शहर पोलिसांनी शनिवारी अटक केली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
शिवाजी हुडको परिसरात घरफोडी करण्याच्या प्रत्नात असलेल्यांचा कट परिसरातील नागरिकांनी उधळून लावल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. यात दोन चोरट्यांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चांगला चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर संशयित हकीम नूर मोहंमद शहा हा घटना घडल्यापासूून फरार होता. हकीम शहा हा शनिवारी पहाटेच्या सुमारास राधाकृष्णनगर परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे तेजस मराठे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ योगेश इंधाटे व होमगार्ड यांना सोबत घेत हकीम शहाला ताब्यात घेतले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर झाला.