शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

वरणगाव फॅक्टरीत सुरक्षा राक्षकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 12:51 IST

भुसावळ , जि. जळगाव : वरणगाव फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांवर एका वाहनातून आलेल्या अज्ञात चार-पाच व्यक्तींनी हल्ला केला. यात दोन ...

ठळक मुद्देदोन सुरक्षा रक्षक जखमी१ मे, पहाटे चारची घटना

भुसावळ, जि. जळगाव : वरणगाव फॅक्टरीच्या सुरक्षा रक्षकांवर एका वाहनातून आलेल्या अज्ञात चार-पाच व्यक्तींनी हल्ला केला. यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. ही घटना १ मे रोजी पहाटे चारला दरबान मुख्य हॉस्पिटल पॉईंटजवळ घडली. अवैध धंदेचालकांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.                                सूत्रांनुसार, वरणगाव फॅक्टरीतील सुरक्षा विभागात काम करणारे मनोज अहिरराव व शांताराम जोहरे आपली ड्युटी बजावत होते. तेव्हा हतनूरकडून एका चार चाकी वाहनात चार-पाच आले. दांडगाई करीत त्यांनी आम्हास फॅक्टरी  इस्टेटमध्ये जाऊ द्या, असे सांगितले. परंतु सुरक्षारक्षकांनी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले. गाडीत काय ठेवले हे बघण्यासाठी सुरक्षारक्षकांनी प्रयत्नही केला. त्यावेळेस यातील गुंडांनी रक्षकाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जीवघेणा हल्ला चढवला. हॉकी स्टीकने  मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ते आलेल्या मार्गाने परत फिरले. सुरक्षारक्षकांच्या बॅटरीची व काठीची मोडतोड गुंडांनी केली.गाडीमध्ये गुटखा किंवा दारू असल्याची शंका व्यक्त होत आहे. सुरक्षारक्षकांना वरणगाव फॅक्टरीच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. या घटनेने सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ही घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. कर्नल अनिल मंकोटिया तसेच सुरक्षा विभागाचे कनिष्ठ कार्य प्रबंधक एन. पी. वाघ, एल.पी. इंगळे, कामगार संघटनांचे पदाधिकारी योगेश सूर्यवंशी, योगेश ठाकरे, संतोष बाऱ्हे, भानुदास सपकाळे, सुहास विभांडीक, कमलेश सिंग, मनीष महाले, गौतम सुरवाडे , आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ