दोन महिन्यात सहा दलित मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST2021-02-26T04:22:57+5:302021-02-26T04:22:57+5:30

मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. जानेवारी व ...

Atrocities on six Dalit girls in two months | दोन महिन्यात सहा दलित मुलींवर अत्याचार

दोन महिन्यात सहा दलित मुलींवर अत्याचार

मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत.

जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात अमळनेर पोलीस ठाण्यात खून, पाचोरा पोलीस ठाण्यात दंगल, जिल्हा पेठ, धरणगाव, मुक्ताईनगर व जामनेर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. यावल पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याशिवाय पाचोरा, अमळनेर, अडावद, पिंपळगाव या पोलीस ठाण्यातही इतर अन्यायाबाबत गुन्हे दाखल झाले आहे.

अशा आहेत पोलीस ठाणे निहाय घटना

अमळनेर : खून

पाचोरा : दंगल

जिल्हा पेठ : बलात्कार

मुक्ताईनगर : बलात्कार

जामनेर : बलात्कार

यावल : विनयभंग

धरणगाव : बलात्कार

अशा आहेत लक्षवेधी घटना

दूध घ्यायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून अत्याचार

दुकानावर दूध घ्यायला जात असलेल्या पंधरा वर्षीय मुलीला अंधाराचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने तोंड दाबून रस्त्याच्या बाजूला नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उघडकीस आली. पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाची वाच्यता झाली. या प्रकरणी बालकल्याण समितीने पीडितेचा जबाब नोंदविला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ८, ५ (ज) ६, ७, ९ अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचार करणारी व्यक्ती कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.

जामनेर तालुक्यात पीडितेची आत्महत्या

जामेनर तालुक्यात १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. अक्षय गोविंदा चोपडे व ऋषीकेश नारायण कोळी (रा.मालदाभाडी, ता.जामनेर) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. हे दोन तरुण पीडितेला दोन महिन्यापासून चिडवत होते, सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती.

मुक्ताईनगर तालुक्यात हातपाय बांधून अत्याचार

पिठाच्या गिरणीत चप्पल घ्यायला गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचे दोन्ही हातपाय बांधून व तोंड दाबून जबरी अत्याचार केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यात २२ रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणात चेतन रवींद्र सुतार (रा.उचंदा, ता.मुक्ताईनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Atrocities on six Dalit girls in two months