शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 16:57 IST2020-07-26T16:55:31+5:302020-07-26T16:57:17+5:30

तक्रार दिल्यास जिवेठार मारण्याची पिडीत मुलीला दिली धमकी

Atrocities on a minor girl at Shengola, youth arrested | शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकाला अटक

शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकाला अटक

ूर ता जामनेर:- शेंगोळा येथे अल्पवयीन मुलीवर २४ वर्षीय तरूणाने अत्याचार करून मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडलीे. याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अनिल सुरेश घोरपडे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीने स्वत: तक्रार दाखल केली असून ती अल्पवयीन आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिडीत मुलगी लघुशंकेसाठी गेली असता यादरम्यान अनिल सुरशे घोरपडे याने तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच घराच्या परीसरात असलेल्या खड्डयात मारहाण करून तिला लोटले. याबाबत कोठे वाच्यता किंवा तक्रार दिली तर जिवे ठार मारेल अशी धमकीही दिली, असे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. यावरून अनिल सुरशे घोरपडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरूद्ध अत्याचार, दमदाटी, मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तपास पोउनि अमोल देवडे करीत आहेत.

Web Title: Atrocities on a minor girl at Shengola, youth arrested