चाकूच्या धाकावर भुसावळात विवाहितेवर अत्याचार

By Admin | Updated: June 30, 2017 17:07 IST2017-06-30T17:07:52+5:302017-06-30T17:07:52+5:30

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घेतले संशयित आरोपीला ताब्यात

Atrocities on the knife of a knife in marriage | चाकूच्या धाकावर भुसावळात विवाहितेवर अत्याचार

चाकूच्या धाकावर भुसावळात विवाहितेवर अत्याचार

>ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.30- शहरातील एका भागात वॉचमन म्हणून आलेल्या विवाहितेवर 22 वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना 24 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भुसावळात घडली़ पीडित विवाहितेने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी शाकीर उर्फ गोलु सैय्यद रशीद (22, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आल़े 
शहरातील एका भागात वॉचमन म्हणून परराज्यातून एक दाम्पत्य आले आह़े या दाम्पत्याच्या असहायतेचा फायदा घेत संशयीत आरोपीने 24 रोजी मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप पीडित विवाहितेने तक्रारीत केला आह़े 
शुक्रवारी सकाळी पीडितेसह तिच्या पतीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुन्ह्याबाबत माहिती जाणून घेत गुन्हा दाखल केला़ संशयीत आरोपीस ताब्यात घेण्यात आले आह़े 

Web Title: Atrocities on the knife of a knife in marriage