जळगाव : पोटच्या १७ वर्षीय मुलीवर बापानेच वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच या नराधम बापास अटक करण्यात आली आहे. मानवता व पिता-पूत्रीच्या नात्याला काळीमा फासणाºया या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१६ मध्ये पीडित मुलीची आई बाहेर गावाला तर भाऊ शाळेत गेलेला असताना घरात कोणी नसल्याची संधी साधून या बापाने अश्लिल वर्तन करुन अत्याचार केला. या वेळी विरोध करुन ओरडली असता मुलीला जीवंत मारुन टाकण्याची धमकी त्याने दिली. आई गावावरुन घरी आली असता तिला हा प्रकार सांगितल्यावर तिने काहीही बडबड करु नकोस म्हणून याकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्याची आणखी हिंमत वाढल्याने त्याने वारंवार धमकावून बलात्कार केला. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी देखील आई बाहेर गावाला गेली होती तर लहान भाऊ गॅलरीत झोपलेला असताना दुपारी १ वाजता जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी देखील विरोध केला असता तुला व तुझ्या आईला मारुन टाकीन, कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. भीतीपोटी आई देखील तक्रार देऊ देणार नाही यामुळे पीडितेने शनिवारी एकटीच येऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिला उपनिरीक्षक कांचन काळे यांनी पीडितेची फिर्याद घेतली. गुन्हा दाखल होताच अटकगुन्हा दाखल झाल्यनंतर उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व रामकृष्ण पाटील यांच्या पथकाने संशयिताचा चार ठिकाणी शोध घेतला असता तो एका गुप्त ठिकाणी मिळून आला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
जळगावात बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:17 IST
पोटच्या १७ वर्षीय मुलीवर बापानेच वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच या नराधम बापास अटक करण्यात आली आहे. मानवता व पिता-पूत्रीच्या नात्याला काळीमा फासणाºया या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
जळगावात बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देकाळीमा फासणारी घटना आईसह मुलीला ठार मारण्याची धमकी, संशयितास अटकनराधम बापास अटक