जळगावात चिमुकल्यांनी घडविले नरकगती ते सिद्धगतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:55 IST2017-12-29T11:50:19+5:302017-12-29T11:55:36+5:30
35 प्रकल्पाद्वारे माहिती

जळगावात चिमुकल्यांनी घडविले नरकगती ते सिद्धगतीचे दर्शन
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29- संपूर्ण जीवनात मनुष्य चार गतीपासून सिद्ध गतीर्पयत कसा पोहचतो, नरक गतीमध्ये कोणत्या यातना सहन कराव्या लागतात याबाबत 80 विद्याथ्र्यांनी विविध प्रकारचे 35 मॉडेल्स तयार करून प्रदर्शनात माहिती देऊन मानवी जीवनाचा प्रवास उलगडला.
ओसवाल मंगल कार्यालयात अखिल भारतीय जैन संस्कृती रक्षक संघ व जळगाव स्थानकवासी जैन श्री संघ यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित पाच दिवसीय बालसंस्कार शिबिराचा गुरुवारी समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, कस्तुरचंद बाफना, नैनसुख लुंकड, प्रकाशचंद समदडीया उपस्थित होते.
हिरालाल बुरड, पारस टाटीया, प्रदीप खिंवसरा, नितीन चोरडिया, अजित चोरडिया, ललित बरडीया, मगराज बाफना, सुरेश टाटिया, राजेंद्र सांखला, सुरेश बुरड, ज्ञानजी बुरड, सरदार बुरड, दिलीप झाबक आदींनी परिश्रम घेतले. जय कोठारी, दीपक रूणवाल, दिलीप कुमट, विमल दुग्गड, ममता खटोड, भावना बेदमुथा आदींनी प्रशिक्षण दिले. प्रतिकृती साकारण्यात ऋषिका खिंवसरा, नीव चोरडिया, प्रथम चोरडिया, पायल भन्साळी, वैष्णवी भन्साळी, भावेश भन्साळी, रिया मुनोत, सम्यक संचेती, मोहित कुचेरीया, दिपेश मुनोत, गौरव जैन, खुशी कुचेरीया, नेहा जैन, रिया सुराणा, साक्षी जैन, आयुषी जैन, रिया पदार आदींचा सहभाग होता.
विद्याथ्र्यांना पारितोषिक
पाच दिवसात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि विविध गतीवर आधारित उत्कृष्ट प्रतिकृती तयार करणा:या विद्याथ्र्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र जैन संस्कृती रक्षक संघ जोधपूर शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हिरालाल बुरड यांचा सत्कार अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आला.