विद्याथ्र्याला बेदम मारहाण

By Admin | Updated: February 15, 2017 01:02 IST2017-02-15T01:02:40+5:302017-02-15T01:02:40+5:30

गणेश कॉलनी परिसरातील घटना : मारहाणकर्तेही विद्यार्थीच

Athletic beat | विद्याथ्र्याला बेदम मारहाण

विद्याथ्र्याला बेदम मारहाण

जळगाव : शाळकरी विद्याथ्र्यामध्येच गुन्हेगारी करणारी टोळी सक्रीय झाली असून गणेश कॉलनी परिसरात दहावीच्या वर्गात शिकणा:या उज्‍जवल संजय पाटील (वय 14 रा.पिंप्राळा, जळगाव) या विद्याथ्र्याला दहा ते बारा विद्याथ्र्यानी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली व त्याच्या खिशातील 2 हजार 200 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
मारहाण करणारे विद्यार्थी हे महामार्गावरील अग्रवाल चौक परिसरातील नामांकित शाळेतील आहेत. उज्‍जवल हा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता गणेश कॉलनीत शिकवणीसाठी जात असताना तेथे त्याच्या वर्गातील एक मित्र त्याला भेटला. यावेळी समोर थांबलेले काही विद्यार्थी त्याच्याकडे पाहून हसू लागले. त्याचा जाब विचारला असता जास्तच चिडवायला लागले. शिवीगाळ करु नका असे सांगितले असता त्यांनी तु आमचे काय करशील, असे सांगून एकाने माङो वडील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर 10 ते 12 जणांनी बेदम मारहाण केली व तेथून दादावाडी परिसरात घेवून गेले. तेथेही मारहाण करुन प्रोजेक्टरचे 200 व शिकवणीचे 2 हजार रुपये हिसकावले. यावेळी अंगावरील कपडेही त्यांनी फाडले. हा प्रकार घरी सांगितला तर तुला मारुन टाकू अशीही धमकी या मुलांनी दिली. या मारहाणीत उज्‍जवलचा पाय फ्रॅर झाला आहे. यापूर्वीही यातील काही मुलांनी 12 जानेवारी रोजी आयएमआर मैदानावर नेऊन मारहाण केली होती. या घटनेबाबत उज्‍जवल याचे वडील संजय पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे जिल्हापेठ पोलिसांनी सांगितले.

Web Title: Athletic beat